बिहार, ता. २१ मे २०२४
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. बिहारमध्ये या मतदानारदरम्यान भारतीय जनता पक्ष आणि आरजेडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. यावेळी झालेल्या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बिहारमध्ये पाचव्या टप्प्यात पाच जागांवर मतदान झाले. काल झालेल्या मतदानानंतर बिहारमधील छपरा जिल्ह्याच्या सारण लोकसभा मतदारसंघात प्रचंड हिंसाचार झाल्याचे समोर आले आहे. भाजप आणि आरजेडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. यावेळी झालेल्या गोळीबारामध्ये एकाच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत सारणचे एसपी गौरव मंगला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरजेडीच्या उमेदवार रोहिणी आचार्य या सोमवारी मतदानादरम्यान छपराच्या भिखारी ठाकूर चौक परिसरात पोहोचल्या होत्या. यावेळी भाजप आणि आरजेडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला.
मात्र याच वादातून आज पुन्हा एकदा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी काचेच्या बाटल्यांनी हाणामारी सुरू झाली. वाद वाढल्यानंतर एका गटाकडून गोळीबार करण्यात आला. ज्यात बडा तेलपा परिसरातील नागेंद्र राय यांचा २६ वर्षीय मुलगा चंदन राय याला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. तर गुड्डू राय आणि मनोज राय हे देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून दोन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.