SHOCKING GAYA PATNA TRAIN INCIDENT WOMAN DRAGGED AND ASSAULTED IN BIHAR Saam Tv
क्राईम

Shocking : भयानक! चैन खेचून रेल्वे थांबवली अन् तरूणीला जबरदस्ती नेलं; ६ जणांनी केला सामूहिक बलात्कार

Bihar Crime News : गया-पाटणा रेल्वे मार्गावर तरुणीला जबरदस्तीने ट्रेनमधून उतरवून सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड. पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • गया-पाटणा रेल्वे मार्गावर गंभीर गुन्हा उघडकीस

  • तरुणीला ट्रेनमधून उतरवून ६ जणांचा सामूहिक अत्याचार

  • पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले

  • रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण

बिहारमधील गया-पाटणा रेल्वे मार्गावर एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. बेलागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका तरुणीला जबरदस्तीने ट्रेनमधून खाली उतरवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.याप्रकरणी १० जणांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जहानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही तरुणी बेलागंजला जात होती. ती गया-पाटणा मार्गावरील ट्रेनने प्रवास करत असताना बेला आणि चकंद स्थानकांदरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. ट्रेन थांबताच आरोपींनी त्या तरुणीला जबरदस्तीने खाली उतरवले आणि जवळच्याच एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे अंधाराचा फायदा घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे.

या अमानुष घटनेनंतर पीडित तरुणीने हिंमत दाखवत कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच बेलागंज पोलीस ठाण्याचे प्रमुख मनोज कुमार पांडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात शोधमोहीम राबवून संशयावरून १० जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे.

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात आरोपींनी हा गुन्हा पूर्वनियोजित पद्धतीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीएसपी रवी प्रकाश सिंह यांनी या घटनेला दुजोरा देत सांगितले की, हा अत्यंत गंभीर प्रकार असून तपास सर्व बाजूंनी केला जात आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT