Bihar Crime News Saam Digital
क्राईम

Bihar News: वहिनीने केली मोठ्या दिराची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Bihar Crime News : बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून वहिनीने आपल्या दिराची चाकूने वार करत निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Woman Kills To Husband Brother

बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून वहिनीने आपल्या दिराची चाकूने वार करत निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंगेर जिल्ह्यातील अदलपुर गावातील २६ वर्षीय अभिषेक कुमारची त्याची वहिनी सोनी कुमारीने चाकूचे वार करत हत्या केली आहे. अभिषेकचे लग्न ३० मे रोजी खरगपूर परिसरातील कंचन कुमारीशी झाले होते. अभिषेक हा सहा भावांमध्ये चौथा असून, तिसरा भाऊ निवास मंडल याच्या बायकोने ही हत्या केली आहे.

विजेच्या कारणावरून केली दिराची हत्या...

अभिषेकच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकची इतर पाच भावंडे एकत्र राहतात आणि त्यांचे घरातील विजेचे कनेक्शन हे स्वतंत्र आहे. बुधवारी (ता.२९) रोजी अभिषेकने घरातील पंखा सुरू केला, तेव्हा वहिनीने त्याच्यावर वीज चोरीचा आरोप केला. यानंतर अभिषेक आणि त्याच्या पत्नीमध्ये काही कारणावरून वाद सुरू होता. अभिषेक आपल्याला शिवीगाळ करत असल्याचे वहिनीला वाटले. दिराने शिवी दिल्याचा राग आल्याने वहिनीने चाकूने त्याच्यावर हल्ला केला. यात अभिषेक गंभीर जखमी झाला होता.

शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून कुटुंबियांनी अभिषेकला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रूग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी अभिषेकला मृत घोषित केले. रूग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती धरहरा पोलीसांना दिली असून, वहिनी घटनास्थळावरून फरार झाली आहे. या प्रकरणाची अधिकची चौकशी करून, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Love Tragedy : प्रेमाचा दुर्दैवी अंत! धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Daily Wear Saree Designs: डेली वेअरसाठी या आहेत युनिक आणि ट्रेडिंग 5 साड्या

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

दोरखंड बांधून उखाडला अख्खाच्या अख्ख्या लाखोंचा खजिना; चोरट्यांनी पळवलं SBIचं एटीएम, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या ३ ते ४ दिवसात मिळणार ३००० रुपये?

SCROLL FOR NEXT