Crime News Yandex
क्राईम

Crime News: अंदाधुद गोळीबार, जमिनीच्या वादातून शेतातच बाप लेकाला संपवलं; बिहारमधील खळबळजनक घटना

Father Son Killed: बिहारमधील अराहमध्ये जमिनीच्या वादातून बाप लेकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे.

Rohini Gudaghe

Bihar Crime News Land Dispute

बिहारमधील (Bihar) अराहमध्ये जमिनीच्या वादातून दोघांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी शेतात पीक काढत असलेल्या कुटुंबावर आरोपींनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर गोळी लागल्यामुळे बाप लेकाचा मृत्यू झाला आहे. दोन एकर जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

(Latest Crime News)

बिहारमध्ये अराहमध्ये दोन एकर जमिनीसाठी दोघांची हत्या करण्यात आली आहे. सशस्त्र हल्लेखोरांनी बाप-लेकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. मृतक त्याच्या कुटुंबीयांसह शेतात गव्हाचे पीक काढत (Bihar Crime News) होते, तेव्हा ही घटना घडली. गावातील दहा-बारा लोक शस्त्रांसह आले. त्यांनी संपूर्ण कुटुंबावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही घटना उदवंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुनीपूर गावात घडली. ६५ वर्षीय रामधर आणि त्यांचा मधला मुलगा मुकेश कुमार सिंग अशी मृतांची नावे आहेत. मृत रामधर याच्यावर याआधी खुनाचा आरोप (Crime News) होता. दोन महिन्यांपूर्वीच तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला असल्याची माहिती मिळतेय.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस अधिकारी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी (Father Son Killed) पोहोचले. भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर गावामध्ये वातावरण तणावपूर्ण आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेबाबत सांगितलं जात आहे की, रघुनीपूर गावात रामधर सिंहचा गावातील काही लोकांशी दोन एकर जमिनीवरून वाद सुरू होता. यापूर्वीही या जमिनीवरून खून आणि मारामारीच्या घटना घडल्या होत्या.

मंगळवारी (२ एप्रिल) रामधर पत्नी आणि मुलांसह त्यांच्या शेतात गव्हाचे पीक काढत होते. त्यानंतर गावातील दहा बाराजणांचा घोळका तेथे शस्त्रे घेऊन पोहोचला. त्यांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात (Bihar Crime) केली. गोळीबारानंतर लोक इकडे-तिकडे धावू लागले. यावेळी गुन्हेगारांनी झाडलेली गोळी रामधर आणि त्याचा मधला मुलगा मुकेश कुमारला लागली. यामध्ये रामधरचा जागीच मृत्यू झाला तर मुकेश कुमारला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला आहे.

मृतक व्यक्तीचा मुलगा योगेश कुमार याने सांगितलं की, गावातील काही लोकांसोबत त्यांचा 2 एकर जमिनीवरून वाद सुरू होता. त्यांचं संपूर्ण कुटुंब शेतात गव्हाचे पीक काढत (Land Dispute) होतं. यावेळी 10 हून अधिक लोकं शस्त्रांसह आले. त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यात वडील रामधर सिंह आणि भाऊ मुकेश कुमार यांचा गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला (crime) आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस मोहिम राबवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT