Bihar Crime Saam tv
क्राईम

Crime: बायकोचं बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध, नवरा सासुरवाडीत गेला असता गोळ्या झाडून हत्या

Bihar Crime: बिहारमध्ये सासुरवाडीत जावयाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लग्नाला १ महिना पूर्ण झाल्यानंतर तो सासुरवाडीत गेला होता त्यावेळी ही भयंकर घटना घडली. या तरुणाच्या बायकोचे महुण्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Priya More

Summary -

  • बिहारमध्ये नवविवाहित तरुणाची गोळ्या झाडून हत्या

  • सासुरवाडी गेले असता ही घटना घडली

  • तरुणाच्या बायकोचे अनैतिक संबंध होते

  • याच कारणावरून त्याची हत्या करण्यात आली

  • पत्नी आणि सासरच्या नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली

बिहारच्या खगरिया जिल्ह्यात भयंकर घटना घडली. याठिकाणी लग्नानंतर सासरवाडीत गेलेल्या जावयाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी पहाटे मुफस्सिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माथर जानली टोला येथे घडली. टोनिश यादव (२२ वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. तो बेगुसराय जिल्ह्यातील दंडारी गावातील वॉर्ड ६ येथील रहिवासी होता.

टोनिशचे लग्न एक महिन्यापूर्वीच झाले होते. तो ८ दिवसांपूर्वीच सासुरवाडीत आला होता. टोनिशच्या नवविवाहित बायकोचे बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. यामुळेच त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय टोनिशच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी टोनिशची बायको, सासू आणि सासऱ्यांसह ४ जणांना अटक केली.

टोनिशची हत्या झाल्याचे कळात त्याच्या कुटुंबीयांनी थेट रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला. त्यांनी टोनिशच्या बायकोसह सासू सासऱ्यांवर हत्येचा आरोप केला. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, लग्नानंतर टोनिश सासरच्या घरी गेला होता. गुरुवारी तो घरी परत येणार होता. त्याआधीच त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. टोनिशच्या बायकोचे हे दुसरे लग्न होते. त्यांनी आरोप केला की, टोनिशच्या बायकोचे एका नातेवाईकासोबत अनैतिक संबंध होते याच कारणावरून त्याची हत्या करण्यात आली.

टोनिश हा पाच भावांपैकी सर्वात लहान होता आणि तो मजुरीचे काम करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पोलिसांनी टोनिशचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी टोनिशची बायको, सासू, सासरे, मेहुणी आणि मेहुणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. घटनेतील आरोपी टोनिशचा मेहुणा फरार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Colombia Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT