Bihar Crime News  Saam Tv
क्राईम

Crime: २ विद्यार्थ्यांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता ४ महिन्यांची गरोदर; आजारी पडल्यानंतर...

Bihar Crime: बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. पीडित मुलगी ४ महिन्यांची गरोदर आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं तर दुसरा फरार आहे.

Priya More

Summary:

  • शाळकरी मुलींवर २ विद्यार्थ्यांकडून वारंवार बलात्कार

  • पीडित मुलगी ४ महिन्यांची गरोदर

  • आजारी पडल्यानंतर घटना उघडकीस आली

  • पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं तर दुसरा फरार

बिहारमध्ये दोन विद्यार्थ्यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी गरोदर राहिल्यानंतर आरोपी मुलाचं हे भयंकर कृत्य समोर आलं. ही घटना मुझफ्फरपूर जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर दुसरा फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातल्या कांती पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. दोन विद्यार्थ्यांनी अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. पीडित मुलगी ४ महिन्यांची गरोदर राहिली तेव्हा ही घटना समोर आली. या घटनेविषयी कळताच मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी कांती पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी देखील अल्पवयीन आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं तर दुसरा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पीडित मुलगी आणि आरोपी एकाच गावात राहतात. पीडित मुलगी शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, विद्यार्थिनी आजारी पडल्यानंतर ती गरोदर असल्याची बाब आम्हाला कळाली. आम्ही मुलीची चौकशी केली असता तिने तिच्यासोबत घडलेली भयंकर घटना सांगितली. दोन्ही आरोपींनी आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिला याबद्दल कुणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही.

मंगळवारी पीडितेवर बलात्कार केल्याची घटना उडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. पीडित मुलीचे कुटुंबीय आरोपीच्या घरी गेले आणि त्यांनी गोंधळ घातला. आरोपीला पकडून त्यांनी मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एका आरोपीला ताब्यात घेतलं. सध्या दुसरा आरोपी फरार आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमानतळामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना- अजित पवार

Gold Rate Prediction: १ लाख २३ हजार तोळा किंमतीच्या सोन्यामध्ये आता गुंतवणूक फायद्याची की तोट्याची? तज्ज्ञांनी दिलेला सल्ला वाचा

Navi Mumbai Airport : नवी मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण, PM नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या विमानतळाचं उद्घाटन, पाहा Inside Video

Festive Offer: सणासुदीला मोठा डिस्काउंट! Samsung Galaxy S24 5G मोबाईलवर ₹३५,००० रुपयांची सूट, पाहा नेमकी किंमत किती?

Shirpur Police : सराईत गुन्हेगाराची पोलिसांच्या हातावर तुरी; शिरपूर पोलीस ठाण्यातून पसार

SCROLL FOR NEXT