Bihar Minor Girl Gang Rape News Saam Tv
क्राईम

Crime News : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला ₹६०० त रूम दिली, नंतर दोघांनी डाव रचला; १६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

Bihar Crime News : दिल्लीतून बिहारमधील मोतिहारी येथे गेलेल्या १६ वर्षीय मुलीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

Alisha Khedekar

  • दिल्लीतून बिहारमधील मोतिहारी येथे धक्कादायक घटना

  • १६ वर्षीय मुलीवर दोन तरुणांचा सामूहिक बलात्कार

  • पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे

Bihar Minor Girl Gang Rape News बिहारमध्ये एका १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे दोन तरुणांनी तिला ओलीस ठेवून हे कृत्य केल्याचं उघड झालं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी एका तरुणाला पकडण्यात पोलिसांना यश आले असून दुसर्याने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक प्रेमी युगुल दिल्लीहून बिहार येथे पळून आले होते. यादरम्यान ते मोतिहारी स्थानकांत थांबले असताना दोन तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी त्या दोघांना आम्ही तुम्हाला राहण्यासाठी रूम देतो सांगून घेऊन जाण्याचा कट रचला. मात्र मुलीने त्यांना नकार दिला. असं असताना देखील आरोपी तरुणांनी त्यांना जबरदस्तीने येण्यास भाग पाडले.

त्यानंतर त्या दोघांना निर्जनस्थळी नेवून आरोपीने मुलीला खोलीत जाण्यास सांगितले आणि तिच्या बॉयफ्रेंडला आरोपी तरुणांनी सामान आणण्याच्या बहाण्याने दुसरीकडे पाठवले. इतक्यात दोन्ही तरुणांनी पीडित मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीच्या बॉयफ्रेंडला संशय आल्याने त्याने घरात घुसखोरी केली. त्यावेळेस आरोपींनी त्याला मारहाण केली. तरुणाने पळ काढून थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली.

घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. यावेळेस तरुणी अर्धनग्न गंभीर अवस्थेत आढळली. रूममधील एका वॉशरूममध्ये तरुण अर्धनग्न अवस्थेत लपून बसलेला पोलिसांना आढळला. तर दुसरा आरोपी पोलिसांच्या हातातून निसटला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity : ॲसिडीटीपासून मिळेल त्वरित आराम, फक्त रोज प्या 'हा' एक ज्यूस

शेंगदाणा टाकून अळुचं फतफतं कसं बनवायचं? सोपी रेसिपी| Alu Fadfade Recipe

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा, परीक्षेच्या १० दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका, ५ लाख घेतल्याचं उघड

Maharashtra News Live Update : RTE प्रवेशात मोठा घोळ, ऑनलाइन पोर्टलवर बंद शाळा, पालकांची मात्र धावाधाव

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT