चंपारण येथे थरकाप उडवून देणारी घटना घडलीय. आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटनेने अनेकांना हादरून सोडलंय. एक मुलीने आपल्याच आईचं मुंडकं उडवल्याची घटनेने अख्या देशाचा थरकाप उडवून दिला. आईची हत्या केल्यानंतर घराला कुलूप लावून मुलगी तेथून फरार झाली. मारेकरी मुलीच्या शारिरीक संबंधला आईने विरोध केल्याने मुलीने कुऱ्हाडीने वार करत आईची हत्या केली.
ही घटना बिहारमधील पूर्वेकडील चंपारणात घडली. चंपारण जिल्ह्यातील हरसिद्धी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घीवाढार गावात ही हादरून सोडणारी घटना घडली आहे. येथे एक विधवा महिला आपल्या मुलीसोबत राहत होती. या महिलेचे मुलीचं अनेक लोकांसोबत शारिरिक संबंध होते. हे तिच्या आईला आवडत नव्हतं. त्याला आईने विरोध केला. याचा राग मनात धरत मुलीने आईची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली.
मारेकरी मुलीचं नाव सोनी कुमार आहे तर मृत आईचं नाव मंजू देवी असं आहे. याप्रकरणी डीसएसपी रंजन कुमार म्हणाले की, ४ जानेवारीला मंजू देवीची हत्या झाली होती. कुऱ्हाडीने वार करत त्यांचा गळा कापण्यात आला होता. मंजू देवी यांची हत्या त्यांच्या मुलीनेच केली होती. आईची हत्या केल्यानंतर मुलगी सोनी कुमार घराला कुलूप लावून फरार झाली होती
पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. त्यानंतर विशेष तपास पथकाची स्थापना करत तपास सुरू केलाय. तपासादरम्यान श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पोलिसांना या हत्येचा मुख्य सुगावा लागला. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. पुरावे आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी मुलगी सोनी कुमारी हिला मुख्य आरोपी म्हणून अटक केलीय.
सोनी कुमारीचे अनेक लोकांशी प्रेमसंबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याला आई मंजू देवी ह्या विरोध करत होत्या. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशी याच मुद्द्यावरून वाद झाला, त्यानंतर रागाच्या भरात सोनीने आईची हत्या केली. या घटनेनंतर सोनी कुमारी घराला कुलूप लावून पळून गेल्याचे पोलिस तपासात समोर आले. मात्र तपास पथकाने लवकरच हे प्रकरण उघड करत तिला अटक केली. चौकशीत सोनीने गुन्ह्याची कबुली दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.