Bihar Court Firing Saam Digital
क्राईम

Bihar Court Firing: बिहारमध्ये कोर्टाच्या आवारात गोळीबार, सुनावणीला आलेल्या 'छोटे सरकार'ची गोळ्या झाडून हत्या

Bihar Court Firing: बिहारची राजधानी पटना येथून धक्कादायक बातमी आहे. येथील दानापूर न्यायालय आवारात सुनावणीसाठी आलेल्या गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. छोटे सरकार असं हत्या करण्यात आलेल्या गुन्हेगाराचं नाव असून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Sandeep Gawade

Bihar Court Firing

बिहारची राजधानी पटना येथून धक्कादायक बातमी आहे. येथील दानापूर न्यायालय आवारात सुनावणीसाठी आलेल्या गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. छोटे सरकार असं हत्या करण्यात आलेल्या गुन्हेगाराचं नाव असून पोलिसांनी दोन हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. छोटे सरकारला बेऊर न्यायालयातून दानापूर न्यायालयात सुनावणीसाठी नेत असताना ही घटना घडल्यामुळे बिहारमध्ये खळबळ माजली आहे.

न्यायालय आवारात झालेल्या गोळीबारात ठार झालेला अभिषेक कुमार उर्फ छोटे सरकार कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. त्यामुळेच त्याला बेऊर कारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान दोन हल्लेखोरांनी त्याची न्यायालय आवारात हत्या केली असून त्यांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी दिली. तसेच त्यांनी न्यायालय आवारतील सुरक्षा व्यवस्थेत निष्काळजीपणा झाला असून या हल्ल्यात आणखी काही जणांचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

न्यायालय आवारात सात राऊंड फायर करण्यात आले आहेत. दरम्यान कोर्ट आवारात झालेल्या या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. छोटे सरकारची कोणी का हत्या केली याची माहिती सध्या मिळालेली नाही. पोलीस तपास कार्यात गुंतले आहे. शिवाय यात गुन्हेगारी टोळीचाही हात असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: भांडुपमधील एका सार्वजनिक शौचालयात सापडलं स्त्री जातीचं अर्भक

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT