bhuinj police arrests two youth from uttar pradesh seized 83 lakh cash  saam tv
क्राईम

Satara : खासगी बसमधून 96 लाख चाेरणारे दाेघा युवकांना अटक

Satara Latest News : पाेलिसांच्या पथकाने घटनास्थळच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. त्यामध्ये २ संशयितांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.

Siddharth Latkar

Satara :

सातारा पाेलिस दलातील भुईंज पोलिसांच्या पथकाने खासगी बसमधून पैशाची बॅग चोरणाऱ्या दोन परप्रांतीयांना उत्तरप्रदेश येथून अटक केली. त्यांच्याकडून ८३ लाखांची राेकड हस्तगत करण्यात आली आहे. हसन जुम्मन मोहम्मद (वय २२, राहणार भवानीगड, महाराजगंज, जिल्हा रायबरेली, उत्तरप्रदेश) तसेच इस्तियाक जान मोहम्मद (वय २१, राहणार पडरिया, महाराजगंज, जिल्हा रायबरेली, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

२२ फेब्रुवारीला बोपेगाव (ता. वाई) येथील एका हॉटेल परिसरातून खासगी बसमधून 96 लाख रुपयांची चाेरी झाली हाेती. याबाबतची तक्रार भुईंज पोलिस ठाण्यात फिर्यादीने नाेंदवली हाेती. त्यानंतर पाेलिसांनी या घटनेचा कसून तपास करण्यास प्रारंभ केला हाेता.

पाेलिसांच्या पथकाने घटनास्थळच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. त्यामध्ये २ संशयितांच्या हालचाली संशयास्पद आढळुन आल्या. त्यादृष्टीने तपास करीत पाेलिसांनी दाेघांना उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्याच्याकडून 83 लाख रुपये हस्तगत केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT