Bhiwandi News Saam TV
क्राईम

Crime News : मित्रानेच काढला मित्राचा काटा, जुन्या वादातून डोक्यात तिडीक गेली अन् जीव घेतला, भिवंडीत रक्तरंजित थरार

Bhiwandi News : भिवंडी शहरात धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून पाच मित्रांनी मिळून जिशान अन्सारी या युवकाची निर्दयी हत्या केली. या घटनेने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

Alisha Khedekar

  • भिवंडीच्या शांतीनगर परिसरात मित्रांनीच मित्राची निर्दयी हत्या केली.

  • किरकोळ वादातून पाच मित्रांनी मिळून मित्राची हत्या केली.

  • या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.

  • या घटनेमुळे परिसरात तणाव आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मैत्रीच्या नात्याला काळिमा ठरणारी धक्कदायक घटना भिवंडीमध्ये घडली आहे. शहरातील शांतीनगर परिसरात एकाच ठिकाणी काम करणारे व एकाच ठिकाणी राहणाऱ्या मित्रांनीच जुन्या शुल्लक कारणावरून मित्राची हत्या केली आहे. जिशान अन्सारी ( वर्षे २५ ) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जिशान व त्याच परिसरात राहणारे हसन मेहबुब शेख ( वर्षे २२ ) मकबुल मेहबुब शेख ( वर्षे ३० ) हुसेन मेहबुब शेख, ( वर्षे २८ ) हे तिघे भाऊ गोदामात एकाच ठिकाणी हमाली काम करण्यासाठी जात होते. या दरम्यान त्यांच्यामध्ये शुल्लक वाद निर्माण झाला. या गोष्टीचा राग हसन मेहबुब शेख, सुलताना मेहबुब शेख,मकबुल मेहबुब शेख, हुसैन मेहबुब शेख व आसमा वाजीद यांच्या मनात खदखदत होता.

या रागाच्या भरात पाच जणांनी जिशान याच्या घरी धाड टाकली. आणि जिशानच्या कुटुंबियांना शिवागळ करीत हाताच्या ठोश्या बुक्यानी,लाथांनी मारहाण केली. त्यावेळी जिशान दुचाकी वरून घरी आला असता. त्याने हा प्रकार पहिला संतप्त झालेला जिशान दुचाकीवरून उतरला. घराच्या दिशेने जाऊ लागला. अशातच त्याला हसन याने लाथ मारून खाली पाडले.

या झटापटीत जिशान याच्या छाती अन् पोटावर जोरात मुक्कामार लागल्याने तो जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिशान याच्या कुटुंबियांनी ५ हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला. कुटुंबियांच्या जबाबानुसार पोलिसांनी या ५ जणांना ताब्यात घेतले आहे. शिवाय हत्येप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या हल्लेखोरांना कडक शिक्षा होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भर मैदानात जोरदार राडा, दोन भारतीय खेळाडू एकमेकांशी भिडले; नेमकं काय घडलं? VIDEO

Nandurbar News: वाहनात पेट्रोल भरत असताना माथेफिरूने पेट्रोल पंपावर आग लावण्याचा धक्कादायक प्रयत्न|VIDEO

Prakash Ambedkar : 'मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण...; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक गार्डनचा तलाव फुटला

Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा! गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?

SCROLL FOR NEXT