Bhiwandi Crime News Saam Digital
क्राईम

Bhiwandi Crime News: चारचाकी वाहनांची करत होते चोरी, भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Bhiwandi Crime News: घरफोडीसह वाहने चोरणाऱ्या त्रिकुटाला भिवंडी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांनी दहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फैय्याज शेख

Bhiwandi Crime News

घरफोडीसह वाहने चोरणाऱ्या त्रिकुटाला भिवंडी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांनी दहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. शिवमंगल इश्वरदिन मिश्रा उर्फ सागर, शफातउल्लाह इस्तीयाक चौधरी उर्फ इरफान व अमान फुरकान खान अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून भिवंडी परिसरात वाहन चोरीसह घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सक्त निर्देश दिले होते. त्यामुळे भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. दरम्यान पोलीस हवालदार अमोल देसाई यांना या गुन्हेगारांविषयी ठोस माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस मागावर असताना दरोडेखोरांच त्रिकुट पोलिसांच्या जाळ्यात सापडलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी शिवमंगल इश्वरदिन मिश्रा उर्फ सागर,शफातउल्लाह इस्तीयाक चौधरी उर्फ इरफान व अमान फुरकान खान यांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी नारपोली, कोनगांव व पडघा या ठिकाणी घरफोडी,वाहने चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून नारपोली पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले 13 लाख किमतीचे तीन टेम्पो व घरफोडीतील मुद्देमाल असा एकूण 39 लाख 40 हजार 813 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026: टॅक्स,रोजगाराचं काय होणार? देशाच्या अर्थसंकल्पात सामान्य लोकांना दिलासा मिळणार?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार शपथविधीनंतर बारामतीला जाणार!

निवडणुकीच्या रणधुमाळीत वादग्रस्त प्रचार; मंत्री भरणेंच्या निकटवर्तीय उमेदवाराच्या Whatsapp स्टेटसमुळे नागरिकांमध्ये संताप

विमानात अजित पवार शेवटचे काय बोलले? ब्लॅक्स बॉक्समधून उलगडा होणार

Nandurbar : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

SCROLL FOR NEXT