Bhandara News  Saam Digital
क्राईम

Bhandara News : चेकपोस्टवर मद्यप्राशन करून झोपणं भोवलं; दोन अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केलं निलंबित

Bhandara News : आचारसंहिता काळात तपासणी नाक्यावर (चेकपोस्ट) कर्तव्यावर असताना दारू पिऊन निवांत झोपणे दोन कर्मचाऱ्यांना चांगलंच भोवलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पवनीचे विस्तार अधिकारी व भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाला निलंबित केलं आहे.

Sandeep Gawade

Bhandara News

आचारसंहिता काळात तपासणी नाक्यावर (चेकपोस्ट) कर्तव्यावर असताना दारू पिऊन निवांत झोपणे दोन कर्मचाऱ्यांना चांगलंच भोवलं आहे. निवडणूक कालावधीत कर्तव्यामध्ये कसूर केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी पवनीचे विस्तार अधिकारी व भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाला निलंबित केलं आहे. एल. जे. कुंभरे विस्तार अधिकारी पंचायत समिती पवनी आणि सचिन पढाळ वरिष्ठ लिपिक सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तपासणी नाका अर्थात चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. भंडारा जिल्हाच्या पवनी तालुक्यात निलज येथेही तपासणी नाका तयार करण्यात आला आहे. निवडणूक आयोगामार्फत नियुक्त निवडणूक निरीक्षक खर्च अधिकारी यांचा पवनी येथे दौरा असता त्यांनी निलज चेकपोस्टला भेट दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी संबंधित कर्मचारी मद्यसेवन करून पोलीस तंबूत झोपून असल्याचे आढळले. लागलीच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात दोषी आढळल्यावर निवडणूक कर्तव्यामध्ये कसूर केल्याबद्दल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित आहे. या घटनेमुळे शासकीय कर्मचारी,अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. निवडणूक कामात हलगर्जी खपवून घेतली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

खजुराच्या निर्यातदाराला लावला ४. ३६ कोटींचा चुना

एपीएममसी मार्केटमधील व्यापाऱ्याकडून इराणमधील खजुराच्या व्यापाऱ्यांकडून तब्बल २३ कंटेनर खजुर आयात करून बिलाची रक्कम न देता इराण मधील व्यापाऱ्याची तब्बल ४ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या फसवणूक प्रकरणात सहभागी असलेल्या एपीएमसी मार्केटमधील फरीद तेली (६०), सादर तेली (३०), विरल शैलेशभाई तन्ना (३०), सुनिलकुमार (३०), देवकुमार ठक्कर उर्फ डी.के. (६०) या सहा व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : ऐन निवडणुकीत कारमध्ये सापडली १६ लाखांची रोकड; नवी मुंबईत मोठी खळबळ

रोज खा मटन अन् दाबा कमळाचे बटन, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा मतदारांना अजब सल्ला|VIDEO

Marathi actress: ठाण्यातील गायमुख घाटात भीषण अपघात, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संतापली; मोजक्या शब्दातून सरकारला सुनावलं

Maharashtra Live News Update: संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय- सुनील तटकरे

'मी सगळं बाहेर काढेल, कोरोनामध्ये...'; 'तिकीटासाठी किशोरी पेडणेकरांकडून उद्धव आणि रश्मी ठाकरेंना धमकी; 'या' बड्या नेत्याचा दावा|VIDEO

SCROLL FOR NEXT