A 24-year-old married woman in Bengaluru allegedly died by suicide due to severe dowry harassmen saam tv
क्राईम

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

Married Woman Killed Herself: बेंगळुरूमध्ये एका २४ वर्षीय विवाहित महिलेने हुंड्याच्या तीव्र छळाला कंटाळून आत्महत्या केलीय. कुटुंबाने पती आणि सासरच्यांकडून १० लाख रुपयांची मागणी केली जात होती.

Bharat Jadhav

  • बेंगळुरूमध्ये २४ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

  • १० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप

  • पती व सासरच्यांकडून शारीरिक-मानसिक अत्याचार

बंगळुरूमध्ये एका २४ वर्षीय विवाहितेनं सासरवासाला कंटाळून आत्महत्या केलीय. पुण्यातील हडपसरमधील घटना ताजी असतानाचा आणखी एका विवाहितेनं आयुष्य संपवलंय. हुंड्यासाठी सासरचे लोक तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते, असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलाय. १० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केला जात होता.

तिचा नवरा तिला कधी बाथरूममध्ये कोंडायचा, तर कधी तिला बेदम मारहाण करत असायचा. पती आणि सासरचे लोक तिच्याकडे लाखो रुपयांची मागणी करत होते, असा आरोप मृत महिलेच्या माहेरच्या कुटुंबियांनी केलाय. ही संतापजनक घटना बंगळुरूच्या तुमकूर जिल्ह्यातील येदियूरमध्ये घडली असून कीर्ती श्री, असं मृत महिलेचे नाव आहे. कीर्तीचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. परंतु तिचा नवरा आणि तिच्या सासरच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला.

वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून कीर्तीने आत्महत्या केली. दरम्यान याप्रकरणी कीर्तीच्या कुटुंबियांनी बनाशंकरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीय. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. कीर्ती तुमकूरमधील मधुगिरी तालुक्यातील रहिवासी होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये तिचं लग्न गुरुप्रसाद याच्याशी झालं होतं.

या लग्नात सुमारे ३५ लाख रुपये खर्च झाला होता. यात ४०० ग्रॅम सोनं आणि ५ लाख रुपये रोख रक्कम दिली होती. इतकं देऊनही कीर्ती श्रीचा पती गुरुप्रसाद आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य पैशांसाठी तिला त्रास देत होते. तर कीर्ती श्रीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांवर हत्येचा आरोप केलाय.

सासरच्या मंडळींच्या आणि पतीच्या त्रासाला कंटाळून तिने आपल्या आई-वडिलांकडेही तक्रार केली होती. त्यानंतर कीर्तीच्या कुटुंबीयांनी वाद सोडवण्यासाठी गुरुप्रसादच्या घरी तीन वेळा पंचायतही बोलावली. मात्र त्यानंतरही सासरच्या लोकांचा छळ थांबला नाही, शेवटी कीर्तीने आत्महत्या केली. कीर्तीच्या सासरच्या लोकांनी घर बांधण्यासाठी तिच्यावर १० लाख रुपये आणण्याचा दबाव टाकल्याचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

Maharashtra Live News Update: मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर खुनी हल्ला

SCROLL FOR NEXT