Bengluru Crime Saam Tv
क्राईम

Shocking: पायलटकडून क्रू-मेंबर तरुणीवर बलात्कार, फाईव्ह स्टार हॉटेलच्या खोलीत खेचत नेलं अन्...

Bengluru Crime: चार्टर्ड फ्लाइटच्या पायलटने क्रू मेबर तरुणीवर बलात्कार केल्याची घटना बंगळुरूमध्ये घडली. बंगळुरूमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पायलटविरोधात गुन्हा दाखल केला.

Priya More

Summary -

  • बंगळुरूमध्ये एका चार्टर्ड फ्लाइट पायलटवर बलात्काराचा आरोप

  • २६ वर्षीय केबिन क्रू मेंबरने बलात्काराचा आरोप केला

  • १८ नोव्हेंबर रोजी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केला बलात्कार

  • पालयटविरोधात गुन्हा दाखल

बंगळुरूमध्ये एका पायलटने केबिन क्रू मेबरवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २६ वर्षीय तरुणीने बंगळुरूमधील एका पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर चार्टर्ड फ्लाइटच्या पायलटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे बंगळुरूमध्ये खळबळ उडाली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, १८ नोव्हेंबरला महिला केबिन क्रू मेबर आणि २ पुरूष पायलट बेगमपेट विमानतळावरून पुट्टपर्थी मार्गे बंगळुरूला एका विशेष चार्टर्ड विमानाने गेले होते. दुसऱ्या दिवशी दुसरे विमान चालवण्याचे नियोजन असल्यामुळे तिघेही रात्री एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले. ते तिघेही संध्याकाळी बाहेर फिरायला गेले होते. त्यानंतर ते हॉटेलवर परत आले. पायलट रोहित शरणने या महिला क्रू-मेबरला सिगारेट ओढणार का असे विचारले? तिने होकार दिल्यानंतर दोघेही स्मोकिंग करत होते.

स्मोकिंग करून झाल्यानंतर ती आपल्या खोलीच्या दिशेने निघाली असता पायलटने त्याच्या खोलीमध्ये तिला ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ही महिला क्रू मेंबर २० नोव्हेंबरला हैदराबादला परत आली. बेगमपेट विमानतळावर पोहचल्यानंतर तिने विमान व्यवस्थापनाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिने बेगमपेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत हे प्रकरण बंगळुरू पोलिसांकडे वर्ग केले.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना १८ नोव्हेंबरला घडली. पण पीडित तरुणीने बंगळुरूमधील बेगमपेट पोलिस ठाण्यात २० नोव्हेंबरला तक्रार दाखल केली. हैदराबादला परत आल्यानंतर तिने ही तक्रार दाखल केली. आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आहे. चार्टर्ड फ्लाइटच्या पायलटविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गंत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण बंगळुरूमध्ये घडल्यामुळे ते बंगळुरूच्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खरे 'ही मॅन', ते कायम आठवणीत राहतील; धर्मेंद्र यांच्या निधनानंर सचिन पिळगावकरांची भावनिक पोस्ट

Mumbai Traffic : मुंबईतील महत्वाच्या पुलावरील वाहतुकीत मोठा बदल, पर्यायी मार्ग काय? जाणून घ्या

कोणत्या भाज्यांमध्ये लसूण वापरू नये?

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू; २३ गंभीर

हिंदी सिनेसृष्टीचा 'ही मॅन' काळाच्या पडद्याआड; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT