Beed Sakshi Kamble Commits Suicide Saam Tv News
क्राईम

Sakshi Kamble Death Case : साक्षी कांबळे मृत्यू प्रकरण; माझ्या लेकीला 'हवाई सुंदरी' व्हायचं होतं, साक्षीच्या आईचा आकांत

Beed Sakshi Kamble Commits Suicide : 'साहेब, तुम्ही 'लाडकी बहीण' म्हणत राज्यातील अनेक महिलांना आधार दिला. पण माझ्या लाडक्या लेकीला न्याय कोण देणार? माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचं होतं.'

Prashant Patil

बीड : बीडमध्ये एका तरूणीने लग्नाच्याच दिवशी छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे. मामाच्या घरातच तिने गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. या प्रकरणी धाराशिव पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला आहे. मात्र, आरोपीला अटक केल्यानंतर त्याला त्वरीत जामीन मिळाला. आता साक्षीच्या आईने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे.

साक्षीच्या आईने पत्रात म्हटलं की, 'साहेब, तुम्ही 'लाडकी बहीण' म्हणत राज्यातील अनेक महिलांना आधार दिला. पण माझ्या लाडक्या लेकीला न्याय कोण देणार? माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचं होतं. मात्र, एका क्षणात ती नाहीशी झाली. काही नराधमांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. तुमच्या भाचीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. साक्षी आता या जगात परतणार नाही, हे आम्हाला देखील ठाऊक आहे. पण क्रुर नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे.'

या पत्रात साक्षीच्या आईने पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. 'स्वप्निल राठोड या पोलीस उपअधीक्षकांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. उलट आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. आरोपींच्या मोबाईलमधील चॅट्स अजूनही उघड करण्यात आलेले नाहीत. आरोपीची बहीण देखील या प्रकरणात सहआरोपी आहे. मात्र, त्याची बहीण पोलीस दलात असल्यामुळे पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याचा आम्हाला संशय आहे,' असं साक्षीच्या आईनं आपल्या पत्रात नमुद केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल

Crime News: सून छोटे कपडे घालून रिल्स बनवायची; सासू सासरे कंटाळले, निराशेतून धक्कादायक पाऊल उचलले

Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनील तटकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय घडामोडींना वेग

CBI चे पथक नाशिकमध्ये दाखल, थेट दिल्लीतून घडामोडींना वेग; नेमकं प्रकरण काय?

Ladki Bahin Yojana: ६६ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, सरकारचा १० हजार कोटींचा भार कमी, महत्वाची अपडेट वाचा

SCROLL FOR NEXT