Beed News Saam TV
क्राईम

Beed News : दोन लाखांसाठी महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, विवाहितेचा गर्भपात; तिघांवर गुन्हा दाखल

Beed News : सासू शकिलाने जमिनीवर पाडून तिच्या डोक्यावर, पाठीवर आणि पोटावर लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे साबियाचे डोक्याला देखील दुखापत झाली आहे.

विनोद जिरे

Beed News :

घरगुती हिंसेची संतापजनक घटना बीडमधून समोर आली. दोन लाख रुपयांसाठी गर्भवती विवाहितेचा छळ करत, पोटावर लाथा मारत मारहाण करण्यात आलीय. मारहाणीनंतर अतिरक्त स्त्राव झाल्याने गर्भवती महिलेचा गर्भपात देखील झाला आहे. ही घटना बीड शहरातील बालपीर भागात उघडकीस आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साबिया इरफान शेख असं पीडित महिलेचं नाव आहे. तर याप्रकरणी पीडित साबीया यांच्या तक्रारीवरून पती, सासू आणि दीर यांच्यावर बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Latest Crime News)

याविषयी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून, 27 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान पती इरफानने साबियाला घरात कोंडून लाथा-बुक्क्यांनी व लोखंडी पाइपने तिच्या हाता-पायावर, पाठीवर अमानुषपणे मारहाण केली. सासू शकिलाने जमिनीवर पाडून तिच्या डोक्यावर, पाठीवर आणि पोटावर लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे साबियाचे डोक्याला देखील दुखापत झाली आहे.

या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून साबियाचा प्रचंड शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तिच्या गर्भपातास कारणीभूत असल्याच्या आरोपावरून पती इरफान बाबू शेख, सासू शकीला बाबू शेख व दीर आमेर बाबू शेख या सर्वांविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड संहिता 1860 अधिनियम प्रमाणे कलम 316, 323, 324, 504, 506, 498 (अ), 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुम्ही एक्सपायर झालेली अंडी खाताय? अंड्यावरही आता एक्सपायरी डेट

Maharashtra Weather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून येलो अलर्ट

10वीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांची चोरी, परीक्षा केंद्राची 'स्ट्राँग रूम' फोडली

Wednesday Horoscope : संसारात गोडवा वाढेल, पार्टनरकडून भेटवस्तू मिळेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार

काही महिने युद्ध सुरूच राहणार? इराणचं सरकार ठाम, ट्रम्प यांना फुटला घाम

SCROLL FOR NEXT