गोकुळ निवडणुकीत नवा ट्विस्ट, 492 संस्थांच्या पात्रतेला सुप्रीम कोर्टात आव्हान

Gokul Election Battle Intensifies in Kolhapur; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच आता निवडणुकीत पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आलाय... त्यामुळे कोल्हापूरात स्थानिक राजकारणही तापलंय. बहुप्रतीक्षित अशा गोकुळ निवडणुकीआधी नेमक्या काय घडामोडी घडताहेत ? पाहूयात या रिपोर्टमधून...
Gokul Milk Union election 2026 latest news in Kolhapur
Gokul Milk Union election 2026 latest news in Kolhapursaam tv
Published On

कोल्हापूरातील बहुप्रतीक्षित गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गोकुळ दूध संघाचा निवडणुकीत महायुतीमधील संस्था पात्र अपात्रतेचा वाद संपल्यानंतर आता न्यायालयीन वाद निर्माण झालाय. कोल्हापूर सर्किट बेंच आणि विभागीय उपनिबंधकांच्या निर्णयानंतर अवसायनातील 492 दूध संस्थांना पात्र ठरवण्यात आलं आणि त्यांचा समावेश गोकुळच्या अंतिम मतदार यादीत करण्यात आलाय. मात्र, याच निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानं गोकुळ निवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आलाय.. हा वाद काय आहे पाहूयात...

इस्पुर्ली येथील श्रीराम दूध संस्थेचे सदस्य रजनीकांत चेंडके यांनी राज्य सरकार आणि सहकार विभागाच्या निर्णयाविरोधात विशेष अनुमती याचिका दाखल केलीये. 492 दूध संस्थांचा अंतिम मतदार यादीतील समावेश कायम राहावा आणि त्यांचा मतदानाचा अधिकार अबाधित राहावा, यासाठी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी पात्र दूध संस्थांना पाठबळ दिलंय.

कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या 1400 दूध संस्थांच्या सत्यविजय मेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. एव्हंढच नव्हे तर 1400 दूध संस्था पात्र होऊ नयेत, यासाठी एक अदृश्य शक्ती काम करत असल्याचा गंभीर आरोप मेळाव्यात करण्यात आला.

तर दुसरीकडे, अदृश्य शक्तीचा आरोप करणाऱ्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे ? हे जर स्पष्ट झालं तर त्यावर आम्ही सुद्धा उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या आणि गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक यांनी दिलीये. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीम आणि भाजप नेते धनंजय महाडीक हे दोन्ही महायुतीचे नेते एकमेकांना शह देतायेत. दुसरीकडे गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत न्यायालयीन वाद काही केल्या संपेना झालेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिलेले असताना पुन्हा न्यायालयीन वादाला तोंड फुटलंय. एकीकडे 492 संस्थांच्या पात्रतेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय... तर दुसरीकडे पात्र ठरलेल्या 1400 संस्थांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलीये. त्यामुळे प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com