Beed Crime Saam Tv
क्राईम

Beed Crime: २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, ऊस तोडणी करताना भयंकर घडलं; बीड हादरले

Beed Police: बीडमध्ये ऊस तोडणीसाठी परराज्यातून आणण्यात आलेल्या दोन मुलींवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. गावातील दोन तरुणांनी हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

Priya More

Summary:

  • बीडमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

  • ऊस तोडणीसाठी परराज्यातून या मुलींना आणण्यात आले होते

  • गावातील दोन तरुणांनी या मुलींवर बलात्कार केला

  • बीड पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ऊस तोडणीसाठी या मुलींना पराज्यातून आणण्यात आले होते. या मुलींवर गावातील दोन तरुणांनी बलात्कार केला. बीडच्या माजलगावमध्ये ही घटना घडली. यामधील एका मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने घटनेची माहिती पालकांना दिली असता हे प्रकरण उघड झाले. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव येथे ही धक्कादायक घटना घडली. या ठिकाणी छत्तीसगडमधून ऊस तोडीसाठी दोन अल्पवयीन मुलींना आणण्यात आले होते. संधीचा फायदा घेत या मुलींवर गावातील दोन तरुणांनी बलात्कार केला. गणेश घाटूळ आणि अशोक पवार अशी आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपींची पोलिस चौकशी करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, २४ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. आरोपींनी या मुलींवर बलात्कार केला. यामधील एका मुलीच्या पोटात प्रचंड दुखू लागले. त्रास होऊ लागल्यामुळे तिने कुटुंबीयांना याची माहिती दिली आणि तिच्यासोबत घडलेला भयंकर प्रकार सांगितला. हे ऐकून मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजलगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलिसांनी दोन्ही मुलींना महिला बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे बीडमध्ये संतापाचे वातावरण आहे. ऊसतोड कामगार महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या घटनेमुळे ऊसतोड मजूर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangladesh: बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या, जमावाकडून आधी धारदार शस्त्राने वार; नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

Municipal Election : २४ वर्षांत पहिल्यांदा घडलं! भिवंडीत उमेदवार बिनविरोध, भाजपनं खातं उघडताच मुख्यमंत्र्यांचा फोन खणखणला

निष्ठावंतांनी भाजप नेत्याला दिलं गाजर भेट,जोरदार घोषणाबाजी अन् पोलिसांचा फौजफाटा|VIDEO

Maharashtra Politics: ऐननिवडणुकीत राज ठाकरेंना शिवसेनेचा 'दे धक्का', अंधेरीत मनसेला भलं मोठं खिंडार

Eyebrow Shape: चेहऱ्याचा आकारानुसार परफेक्ट आयब्रो शेप कसा द्यायचा?

SCROLL FOR NEXT