Beed crime news Youth Brutally Assaulted with Iron Rods and Knives Saam Tv
क्राईम

Crime News: भय इथले संपत नाही! लोखंडी रॉड, काठ्या आणि चाकूने तरुणावर बीडमध्ये भरदिवसा अमानुष हल्ला, धक्कादायक कारण समोर

Crime News: बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील खलापुरी येथे तरुणावर लोखंडी रॉड, काठ्या व चाकूने भरदिवसा अमानुष हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shruti Vilas Kadam

Crime News: बीड जिल्ह्यातील हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून पुन्हा एक घटना समोर आली आहे. शिरूर कासार तालुक्यातील खलापुरी येथे शुल्लक कारणावरून एका तरुणावर लोखंडी रॉड, लाकडी दांड्यां आणि चाकूने भरदिवसा अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत.

जखमी तरुणाचे नाव नितीन कल्याण लोंढे (वय ३२) असे असून तो खलापुरी येथील सतीश यांच्या हॉटेलवर गेला होता. वाढदिवसाच्या कार्यक्रमात झालेल्या एका वादाबाबत चर्चा करण्यासाठी तो मोमीन पठाण यांना भेटायला गेला असता, रोहित तुळशीदास गायकवाड, शुभम आण्णा लोंढे, आसिफ मोमीन शेख आणि साहिल मोमीन पठाण या चौघांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी नितीन लोंढे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले, हातावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तसेच उजव्या बाजूच्या बरगड्यांवर बेदम मारहाण केली.

या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी नितीन लोंढे यांच्यावर सध्या बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर चार दिवस उलटूनही पोलीस पंचनाम्यासाठी घटनास्थळी फिरकले नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, संबंधित चौघांची गावात आधीपासूनच दहशत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यापूर्वीही मारहाणीच्या घटनांमध्ये त्यांची नावे आल्याचे सांगण्यात येत असून, ठोस कारवाई न झाल्यामुळे गावकरी संतप्त आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खांडखुळे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad Election: राज्यात भाजपचा धमाका! ZP निवडणुकीआधीच उडवला विजयाचा बार, कोकणात १० जण बिनविरोध, विरोधकांना मोठा धक्का

Maharashtra Live News Update: चंद्रपूर मनपात सत्ता स्थापनेत एक नवा ट्विस्ट

Dog Attack: कुत्र्यांची टोळी अंगावर धावली तर काय कराल? दुचाकी चालकांनी ही माहिती वाचाच

Hair Care: आठवड्यातून २ वेळा हे तेल नक्की लावा; केस गळणे, कोंडा, फ्रिझी केस यांसारखे त्रास होतील कायमचे बंद

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे अवघ्या 26 व्या वर्षी निधन, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT