Border 2: सनी देओलच्या 'बॉर्डर २'ची क्रेझ न्यारी; आधी पोस्टरवर हार घातला, नंतर दूधाचा अभिषेक केला, पाहा VIDEO

Border 2: 'बॉर्डर २' हा चित्रपट या शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना चित्रपटाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद अनुभवायला मिळत आहे. सनी देओलचे चाहते चित्रपटाच्या पोस्टरवर दूधाने अभिषेक घालत आहेत.
Border 2
Border 2Saam tv
Published On

Border 2: सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांची प्रमुख भूमिका असलेला "बॉर्डर २" हा चित्रपट २३ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. प्रेक्षकांनाही पहिल्या दिवसापासून गर्दी करायला सुरुवात केली आहे. लोक ट्रॅक्टरवर चित्रपटाचे पोस्टर लावून तिकिटे खरेदी करत आहेत. सनी देओलच्या चाहत्यांचा क्रेझ वेगळ्याच पातळीवर आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये एका चाहत्याने "बॉर्डर २" मधील सनी देओलच्या पोस्टरवर दूधाने अभिषेक घातला आहे.

सनी देओलच्या पोस्टरवर दूधाने अभिषेक

'बॉर्डर २' प्रदर्शित झाल्यानंतर, सनी देओलचे चाहते वेडे झाले आहेत. काही जण त्याच्या लूकप्रमाणे कपडे घालून थिएटरमध्ये येत आहेत, तर काही जण आनंदाने नाचत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक चाहता 'बॉर्डर २' मधील सनी देओलच्या पोस्टरला हार घालताना दिसत आहे. त्यानंतर तो अभिनेत्याच्या पोस्टरला दुधाने अभिषेक घालताना दिसत आहे. दरम्यान, थिएटरबाहेर एक महिला प्रेक्षक नाचताना दिसली. लोक हातात तिरंगा घेऊन चित्रपटाचा पाहायला जात आहेत.

Border 2
Actor Second Marriage: अभिनेत्याने केलं दुसरं लग्न, 19 वर्षांच्या मुलीला सोशल मीडियावरून समजलं; रडत म्हणाली, 'एक मुलगी म्हणून...'

प्रेक्षक ट्रॅक्टरवरून तिकिटे बुक करण्यासाठी आले

एका व्हिडिओमध्ये सनी देओलचे चाहते ट्रॅक्टरवरून तिकिटे बुक करण्यासाठी येत आहेत. त्यांनी त्यावर चित्रपटाचे पोस्टर लावले आहेत.याव्यतिरिक्त, काही लोक 'बॉर्डर २' चे पोस्टर हातात घेऊन फिरताना दिसले. मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये ही क्रेझ आहे.

Border 2
Viral Video: प्रेयसी नशेत होती, बॉयफ्रेंड घरी घेऊन आला, पण दार उघडताच...; नंतर जे घडलं त्यानं सगळेच हादरले

"बॉर्डर २" चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

"बॉर्डर २" हा चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या "बॉर्डर" चा सिक्वेल आहे. चित्रपटाच्या कलेक्शनच्या बाबतीत, त्याची सुरुवात चांगली झाली आहे. या चित्रपटाने शुक्रवारी पहिल्या दिवशी ३० कोटी रुपये कमावले, पहिल्या दिवशी २८ कोटी रुपये कमावणाऱ्या 'धुरंधर' ला मागे टाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com