Beed Kej Crime News Saam Tv
क्राईम

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

Beed Kej Crime News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात हनुमंत पिंपरी शिवारात २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • बीडच्या केज तालुक्यात २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

  • हनुमंत पिंपरी शिवारात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला

  • गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या

  • पोलिसांनी एक संशयित ताब्यात घेऊन तपास वेगात सुरू

माधव सावरगावे, बीड

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पुन्हा एकदा हत्येचा थरार पाहायला मिळाला आहे. हनुमंत पिंपरी शिवारात एका २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्की उर्फ आण्णा रावसाहेब चंदनशिव (वय २५ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. केवड आणि हनुमंत पिंपरीच्या शिवारात विक्कीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. अज्ञात हल्खोराने विक्कीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. जखम खोल असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

आज सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.घटनेची माहिती मिळताच केज पोलीस दलासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटेश देशपांडे, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व महेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, इनामदार आणि अशोक सोनवणे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास वेगाने सुरू केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत महेश चंदनशिव नावाच्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. हा खून जुन्या वादातून झाला की अन्य काही कारणातून, याचा तपास पोलीस करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC Spilt : ममता बॅनर्जींचे २० खासदार 'नॉट रीचेबल'; भाजप मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीत गुप्त बैठक, महाराष्ट्रासारखा पक्ष फुटणार?

Empty Stomach Fruits: रिकाम्या पोटी ही फळं चुकूनही खाऊ नयेत

Hair Care: केसगळती, कोंडा आणि ड्रेयनेसला म्हणा बाय-बाय! फक्त या सवयींनी मिळतील हेल्दी केस

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

Silver Price Today: सोन्यानंतर चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण, वाचा ताजे दर

SCROLL FOR NEXT