Akshay Shinde Saam Tv
क्राईम

Akshay Shinde: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची आत्महत्या, पोलिसांकडून बंदूक हिसकावून झाडल्या स्वत:वर गोळ्या

Badlapur Crime Case Accused Akshay Shinde Latest Updates: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केलीय.

Bharat Jadhav

Crime News Updates in Marathi: बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्या केलीय. पोलीस रिमांडवर नेत असतांना आरोपी अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत स्वत:वर तीन गोळ्या झाडल्या. तळोजा तुरुंगातून ठाणे येथे रिमांडसाठी घेऊन जात असताना आरोपी अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि स्वत:वर गोळ्या झाडल्या, यात आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झालाय. आज बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलीस ठाण्याकडे जात होते. त्याचवेळी त्याने बंदूक घेऊन स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केली.

आज बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलीस ठाण्याकडे जात होते. तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता त्याला ठाण्याला घेऊन जात होते. त्यावेळी पोलिसांची बंदूक हिसकावून घेत त्याने स्वत:वर देखील गोळी झाडली. अक्षय शिंदे याने तीन राऊंड फायर केलेत.अक्षयने तीन गोळ्या झाडल्याने ही आत्महत्या नसून पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर करण्यात आल्याच म्हटलं जात आहे. बदलापूर मधील एका शाळेत त्याने अल्पवयीन मुलीवर त्याने अत्याचार केला होता. परंतु या प्रकरणात त्याला अडकवलं जात असल्याचा आरोप त्याच्या आईने केला होता.

बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणारा आरोपी अक्षय शिंदे याचे वय केवळ 24 वर्षे आहे. त्याचे तीन वेळा लग्न झाले होते. मात्र त्याच्या तीनही पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या. तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती देखील समोर आली होती. अक्षयवर दोन मुलींवर लैंगिक छळ केल्याचा आरोप होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT