Beed News Saam Digital
क्राईम

Beed News: बी फार्मसीचा पेपर द्यायला गेलेला राजकुमार घरी परतलाच नाही, घरातील दृश्य बघून आई जागीच कोसळली

Beed Crime News: बी फार्मसी झालेल्या 25 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या केज तालुक्यातील आडस गावात उघडकीस आली आहे

Sandeep Gawade

Beed News

बी फार्मसी झालेल्या 25 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या केज तालुक्यातील आडस गावात उघडकीस आली असून राजकुमार गणेश शिंदे (रा. आडस ता. केज) असं मयत तरुणाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार हा फार्मसिस्टचा पेपर देण्यासाठी जळगाव येथे गेला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्यामुळे काळजीत पडलेल्या त्याच्या आईने चौकशीसाठी फोन केला. मात्र त्यांने फोन उचलला नाही. त्याचं गावातच आणखी एक घर आहे. त्यामुळे राजकुमारच्या आईने गावातील आपल्या दुसऱ्या घरी जाऊन पाहिलं असता तिला धक्काच बसला. राजकुमारने गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सरोरचं दृष्य पाहून राजकुमारची आई जाग्यावर कोसळली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली असून राजकुमार शिंदे याने नेमकी आत्महत्या का केली ? याचा तपास केज पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pomegranate Vs Dragon Fruit : डाळिंब vs ड्रॅगन फ्रूट ? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

मनोज जरांगे पाणी प्यायले, पण उपोषणावर ठाम; नेमकी चर्चा काय अन् निर्णय काय झाला?

जरांगेंची तब्येत बिघडली, आंदोलन चिघळणार? राज्यभरात जरांगेंचे समर्थक रस्त्यावर

Fact Check: महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद? NCMC कार्ड नसलेल्या महिलांना फूल तिकीट?

Google Gemini : हवी ती फ्रेम, हवा तो सीन आणि हवा तसा टकाटक व्हिडिओ...Gemini चं नवं फीचर करणार मार्केट जाम!

SCROLL FOR NEXT