assistant sub inspector held for taking bribe worth rs 8 thousand in gondia Saam Digital
क्राईम

Gondia Crime: सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला आठ हजारांची लाच घेताना पकडले, गाेंदियामधील तिसरी माेठी कारवाई

तक्रारदार यांच्यावर गोंदिया शहर पोलिसांत गुन्हा दाखल असून तक्रारदार आणि गैरअर्जदार यांच्यात समझाेता करून दिल्याचा मोबदल्यात 10 हजार रुपयाची लाच मागितली होती असा आराेप अनिल पारधी यांच्यावर हाेता.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

गोंदिया शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल पारधी यास 8 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. विशेष म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची महिन्याभरातील ही तिसरी मोठी कारवाई आहे.

गाेंदिया जिल्ह्यात 7 मे 2024 ला गोरेगाव तहसीलदार, नायब तहसीलदार व एका खाजगी इसमाला लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यानंतर 14 मे 2024 ला गोंदियाच्या सडक अर्जुनी येथील नगरपंचायतीमध्ये नगरपंचायत मुख्याधिकारीसह नगराध्यक्ष व नगरसेवक अशा 6 लोकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.

त्यानंतर पुन्हा पोलिस विभागातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. अनिल पारधी (54) असे लाचखोर पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

तक्रारदार यांच्यावर गोंदिया शहर पोलिसांत गुन्हा दाखल असून तक्रारदार आणि गैरअर्जदार यांच्यात समझाेता करून दिल्याचा मोबदल्यात 10 हजार रुपयाची लाच मागितली होती असा आराेप अनिल पारधी यांच्यावर हाेता. तडजोडी अंती 8 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पारधी यास रंगेहात पकडल्याची माहिती एसीबीच्या अधिकारी यांनी दिली. गोंदिया शहर पोलिस ठाणे येथे अनिल पारधी याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT