arti chandravanshi dead body found in home near anandvan chandrapur  Saam Digital
क्राईम

Chandrapur Crime News : आनंदवनात युवतीची हत्या, सेवाग्रामहून परतल्यानंतर पालकांना बसला माेठा धक्का

arti chandravanshi dead body found in home near anandvan chandrapur: आरतीचा मृतदेह पाहताच तिच्या कुटुंबियांची गाळणच उडाली. पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने तपासासाठी पथके पाठविली आहेत.

संजय तुमराम

(कै.) बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पात पुनर्वसित दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये पालकांसमवेत राहणा-या एका युवतीचा गळा चिरुन हत्या झाल्याची घटना समाेर आली आहे. संबंधित युवती घटस्फाेटित हाेती. आरती दिगंबर चंद्रवंशी असे मृत युवतीचे नाव असून पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

आरती चंद्रवंशी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील आनंदवन येथे आई-वडिलांसोबत वास्तव्याला होती. तिचे वडील दिगंबर चंद्रवंशी हे दिव्यांग (अंध) आहेत. गेल्या 40 वर्षांपासून ते आनंदवन येथे राहतात.

दिगंबर चंद्रवंशी हे काल आपल्या पत्नीसह उपचारासाठी सेवाग्राम येथे गेले होते. काल रात्री उशिरा घरी आल्यावर तिच्या आईला घराच्या बाथरूममध्ये आरती रक्ताच्या थारोळ्यात दिसली. तिचा जागीच मृत्यू झाला हाेता. आरतीच्या गळ्यावर घाव असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. वरोरा पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा नाेंदविला असून घटनेचा कसून तपास सुरू केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT