Odisha Crime Saam Tv
क्राईम

Crime: सावत्र बाप करायचा लैंगिक अत्याचार; वैतागून घर सोडून पळालेल्या मुलीवर दोघांकडून सामूहिक बलात्कार

Odisha Crime: आंध्र प्रदेशमधून ओडिशाला गेलेल्या १७ वर्षीय तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून ही मुलगी घर सोडून पळाली होती.

Priya More

Summary:

  • आंध्र प्रदेशमधील अल्पवयीन मुलीवर ओडिशात सामूहिक बलात्कार

  • वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून ती घर सोडून पळाली

  • ओडिशामध्ये दोन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला

  • या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली

आंध्र प्रदेशमधील १७ वर्षीय मुलीवर ओडिशामध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सावत्र बापाकडून होत असलेल्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून ही मुलगी घर सोडून पळाली. ती ट्रेनने ओडिशा गेली. त्याठिकाणी गुंगीचे औषध देत तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना २९ मार्च रोजी ओडिशाच्या बेरहामपुर येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आणि एका अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवले. पोलिसांनी पीडित मुलीच्या सावत्र वडिलांविरोधात देखील गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आंध्र प्रदेशच्या कडप्पा जिल्ह्यामध्ये राहते. वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईने लग्न केले. त्यामुळे ती सावत्र बापासोबत राहत होती. सावत्र बाप या मुलीवर रोज लैंगिक अत्याचार करायचा. या त्रासाला कंटाळून तिने घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. ही मुलगी २४ मार्चला प्रशांती एक्स्प्रेस पकडून ओडिशाच्या बेरहामपूर येथे गेली. रेल्वे स्टेशनवर एका चहाच्या दुकानात तिला काम मिळाले. त्याच ठिकाणी तिची एका १५ वर्षांच्या मुलासोबत ओळख झाली.

२९ मार्चला या मुलाने पीडित मुलीची आपल्या दोन मित्रांसोबत भेट करून दिली. या दोघांनी गुंगीचे औषध मिसळून पीडित मुलगी आणि त्या मुलाला पेय प्यायला दिले. ते प्यायल्यानंतर दोघे बेशुद्ध पडले. त्यानंतर दोघांनी या मुलीवर बेशुद्धावस्थेत सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी काही स्थानिक नागरिकांना पीडित मुलगी बेशुद्धावस्थेत दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव पीडित मुलीला तात्काळ रुग्णालयात नेलं.

पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला तेव्हा तिने सांगितले की, ती १८ वर्षे ८ महिन्यांची असून चार दिवसांपूर्वी ती आंध्र प्रदेशमधून ओडिशाला ट्रेनने आली. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय अर्जुन आणि १९ वर्षीय आदित्य या दोन तरुणांना अटक केली. तर पोलिसांनी १५ वर्षीय मुलाला ताब्यात घेत बालसुधारगृहात पाठवले. पोलिसांनी आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या सावत्र वडिलांविरोधात आंध्र प्रदेशमध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपल्या मागण्यासाठी महिलांनी सिंचन भवन येथील संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर फोडल्या बांगड्या

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

SCROLL FOR NEXT