Valgaon 2 Youths Set Fire to Mahavitaran Office  Saam Tv News
क्राईम

गुल झाली बत्ती, महावितरणची 'भट्टी'; महावितरणच्या कारभारामुळे संतापाचा उद्रेक, वारंवार फोन करुनही उत्तर नाही

Valgaon 2 Youths Set Fire to Mahavitaran Office : ऐन पावसाळ्यात महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा सर्वसामान्यांना फटका बसतो. त्यामुळे महावितरण आणि ग्राहकांमध्ये खटके उडतात.

Bharat Mohalkar

भरत मोहोळकर, साम टिव्ही

अमरावती : ऐन पावसाळ्यात महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा सर्वसामान्यांना फटका बसतो. त्यामुळे महावितरण आणि ग्राहकांमध्ये खटके उडतात. मात्र आता अमरावतीच्या वलगावमध्ये २ तरुणांनी थेट महावितरणच कार्यालयच पेटवून दिलंय. महावितरणच्या वीज पुरवठ्यात बिघाड झाला आणि रात्रभर तो दुरुस्तच केला नाही. त्यामुळे रेवसा गावातील लहान मुलं, वृद्ध आणि आजारी रुग्णांना त्रास सहन करावा लागला. तर महावितरणला फोन करुनही उत्तर न आल्याने २ तरुणांनी महावितरणच्या कार्यालयातील टेबलावर पेट्रोल टाकून आग लावलीय.

या प्रकरणात २ जणांना अटक करण्यात आलीय. वारंवार वीज गेल्याने गैरसोय जरी होत असली तरी महावितरणच्या कारभाराला वैतागलेल्या नागरिकांनी कायदेशीर मार्गानेच याचा निषेध करायला हवा तर दुसरीकडे कर्तव्यात कसूर करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Gore: खणाची साडी अन् निखळ हास्य, अपूर्वाचा लूक पाहून चाहते घायाळ

Vastu Tips: घरात धन, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास हवा आहे? अवश्य फॉलो करा 'या' वास्तु टिप्स

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Beed News: धनंजय मुंडेंचं आयुष्य उद्ध्वस्त करून वाल्मिक कराडला मंत्री व्हायचं होतं – बाळा बांगरांचा गंभीर दावा|VIDEO

Mumbai To Kargil : मुंबई ते कारगिल प्रवास कसा करायचा? जाणून घ्या मार्ग, आणि एकूण खर्च

SCROLL FOR NEXT