Amravati Breaking News:  Saamtv
क्राईम

Amravati Crime: बँक अधिकारी पत्नीची निर्घृण हत्या, सासरच्यांनी आत्महत्येचा बनाव रचला पण... भयंकर घटनेने अमरावती हादरलं!

Amravati Breaking News: आधी पतीकडून पत्नीची हत्या, नंतर आत्महत्येचा रचलेला बनाव. अमरावती शहरात घडलेल्या भयंकर हत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पतीसह सासु सासऱ्याला अटक केली आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती| ता. २६ मे २०२४

चारित्र्यावर संशय घेत पतीने बँकेत अधिकारी असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमधून समोर आली आहे. अमरावतीच्या अर्जुननगर येथील स्नेहा कॉलनीत घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चारित्र्यावर संशय घेत बँक अधिकारी पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या अर्जुननगर येथील स्नेहा कॉलनीत घडली. दीप्ती चेतन सोळंके (वय 35) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव असून चेतन सोळंके असे आरोपी पतीच नाव आहे. या धक्कादायक घटनेने अमरावती जिल्हा हादरुन गेला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,दीप्ती सोळंके या दर्यापूर येथील स्टेट बँकेत अधिकारी होत्या तर पती चेतन सोळंके हा पशुसंवर्धन विकास अधिकारी होता. पती चेतनला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून त्याने डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करत पत्नीची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतर पत्नीला फास लावत आत्महत्या केल्याचा बनावही रचला.

मात्र शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे खरे कारण समोर आले आणि नराधम पतीसह सासऱ्यांचा डाव फसला. या प्रकरणी मृत महिलेचा पती, सासू व सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. गाडगे नगर पोलीस स्टेशन या घटनेचा अधिक तपास करत आहे. दरम्यान, चारित्र्याच्या संशयातून उच्च शिक्षित पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याच्या या घटनेने अमरावती शहर हादरुन गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC T20 WC 2026: विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; BCCI कडून १३१ कोटींचं बक्षीस

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

Narayanpet Saree Types: लग्नसराईत यावेळी खरेदी करा नारायणपेठ साडी, पाहा या ७ ट्रेंडी बजेटमध्ये असलेल्या डिझाईन्स

Rajya Sabha Election: शरद पवार, रामदास आठवलेंसह २६ जण बिनविरोध खासदार, 'या' ११ जागांसाठी होणार निवडणूक

Hair Care : सिल्की आणि शायनी केसांसाठी वापरा ही सोपी ट्रिक, हे आहेत घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT