Malegaon Firing : मालेगावात मध्यरात्री गोळीबाराचा थरार; माजी महापौरांवर अज्ञातांनी झाडल्या 3 गोळ्या, परिसरात खळबळ

Nashik Malegaon Firing news : नाशिकच्या मालेगावमध्ये रविवारी मध्यरात्री गोळीबार झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी माजी महापौर आणि एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार केला.
मालेगावात मध्यरात्री गोळीबाराचा थरार; माजी महापौरांवर अज्ञातांनी झाडल्या 3 गोळ्या, परिसरात खळबळ
Nashik Malegaon Firing newsSaam TV

अजय सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये रविवारी मध्यरात्री गोळीबार झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी माजी महापौर आणि एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात अब्दुल मलिक गंभीर जखमी झाले आहेत.

मालेगावात मध्यरात्री गोळीबाराचा थरार; माजी महापौरांवर अज्ञातांनी झाडल्या 3 गोळ्या, परिसरात खळबळ
Dhule Accident CCTV: धुळ्यात कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

हाताला, पायाला तसेच बरगडीत गोळी लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अब्दुल मलिक हे मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी दुचाकीवरून तीन हल्लेखोर आले. त्यांनी मलिक यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.

या गोळीबारात मलिक यांच्या हाताला, पायाला तसेच बरगडीत गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेनंतर एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी रुग्णालयात जाऊन मलिक यांची भेट घेतली.

मालेगावात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप आमदार मुफ्ती यांनी केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याची केली त्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

मालेगावात मध्यरात्री गोळीबाराचा थरार; माजी महापौरांवर अज्ञातांनी झाडल्या 3 गोळ्या, परिसरात खळबळ
Nanded News: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक, २ तरुणांचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com