क्राईम

Amravati Crime: अमरावतीत १८० मुलींचे लैंगिक शोषण, आरोपी निघाला MIM चा नेता

MIM Leader Physical Exploits 180 Women: अमरावतीमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने १८० हून अधिक महिलांना जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केले आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले.

Bharat Jadhav

  • अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून महिलांचे शोषण प्रकरण उघड

  • ३५० हून अधिक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून मोबाईल जप्त केला

नाशिकमधील खरात प्रकरण गाजत असतानाच अमरावतीमधील नव्या प्रकाराने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका युवकाने त्यांचे व्हिडिओ काढली त्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या तरुणाला अटक केली आहे.

मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीरने अनेक तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करत त्यांचे लैंगिक शोषण केले. जवळपास २०० मुलींचे लैंगिक शोषण केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. याप्रकरणाची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुलींचे शोषण करणारा हा राजकीय पक्षाचा नेता आहे. अयाज MIM चा पदाधिकारी आहे.

मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीरने अनेक तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करत त्यांचे लैंगिक शोषण केले. जवळपास २०० मुलींचे लैंगिक शोषण केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केला आहे. दरम्यान आरोपीने मुलींसोबत शरीरसंबंधाचे व्हिडिओ स्वत:च चित्रित केले होते. हे व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये पीडित तरुणींची असहायता स्पष्टपणे दिसून येत आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी याचसंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची सोमवारी भेट घेतली होती. याप्रकरणी तात्काळ पोलिसांनी एसआयटी स्थापन करावी, तसेच संध्याकाळपर्यंत पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करावी, नाहीतर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू , असा इशारा खासदार अनिल बोंडे यांनी दिला होता. खासदाराच्या इशाऱ्यानंतर आज पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

तीन दिवसांपासून व्हायरल होतायत व्हिडिओ

गेल्या तीन दिवसांपासून आरोपीचे तरुणींसोबतचे व्हिडिओ तीन दिवसांपासून व्हायरल होत आहेत. तरीही पोलिसांनी आरोपीला अटक केली नव्हती. पोलिसांनी सुमोटो कारवाई का केली नाही? असा सवाल खासदार अनिल बोंडे यांनी उपस्थित केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teacher Dies : हळहळ! जनगणनेची माहिती घेतानाच शिक्षकाचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Cockroach Janata Patry: सोशल मीडिया अकाउंट बंद होताच कॉक्रोच जनता पार्टीनं उचललं मोठं पाऊल

Maharashtra News Live Update: सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात २६ मे पासून वाढ

उपमुख्यमंत्र्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड; इंजिनमधून अचानक निघू लागला धूर

Akshay Kumar Troll: अक्षय कुमार बनला भोजपुरी 'आयटम बॉय'; 'घिस घिस घिस' गाण्यामुळे अभिनेत्याला ट्रोलिंग, मीम्स तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT