Ambernath Crime News
Ambernath Crime News Saam TV
क्राईम

Ambernath News: मित्राचं बाळ पाहण्यासाठी आले अन् कपाट साफ करून गेले; अंबरनाथमधील घटना, दोघांविरोधात गुन्हा

अजय दुधाने

Ambernath Crime News

नवजात बाळाला पाहण्यासाठी आलेल्या दोन मित्रांनी मित्राच्या घरातच डल्ला मारला. कपाटात ठेवलेले ३ लाख २९ हजारांचे दागिने त्यांनी लंपास केले. ही धक्कादायक घटना अंबरनाथच्या नवीन वडवली परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मित्रांनीच मित्राच्या घरात चोरी केल्याचं समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिरीष कांबळे आणि दिपाली मांजरे, अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिमेच्या नवीन वडवली परिसरातील थारवाणी गृहसंकुलात तक्रारदार मोनिका रोहित निकम राहतात.

दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी शिरीष कांबळे आणि दिपाली मांजरे हे दोघेजण बाळाला पाहण्यासाठी आले होते. दोघेही मोनिका यांच्या पतीचे मित्र आहेत. घरात कुणाचे लक्ष नसल्याचं पाहत आरोपींनी कपाटात ठेवलेल्या पर्समधील दागिने लंपास केले.

दरम्यान, तक्रारदाराने कपाट उघडून बघितलं असता, त्यांना दागिन्यांचे दिसून आले नाही. त्यांनी तातडीने मित्रांना फोन केला असता दोघांनीही तक्रारदाराचे फोन उचलले नाही. यामुळे मित्रांनीच आपल्या घरात चोरी केल्याचा संशय तक्रारदाराला आला.

त्यांनी तातडीने अंबरनाथ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी शिरीष कांबळे आणि दिपाली मंजुरे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud-Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

SCROLL FOR NEXT