ambad police arrests 6 youth in cidco trimurti nagar fighting case near nashik saam tv
क्राईम

Nashik Crime News : वर्चस्वाच्या वादातून त्रिमूर्ती नगरमध्ये गाेळीबार, सहा युवकांना अटक (Video)

सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात रात्री घडली गुंडांनी तलवार घेवुन परिसरात दहशत माजवली. या घटनेने संपूर्ण परिसर हा हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik :

नाशिकच्या सिडको त्रिमूर्ती नगरमध्ये भर वस्तीत रविवारी मध्यरात्री टोळीमध्ये गोळीबार झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी 6 संशयितांना ताब्यात घेतले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिकच्या सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोघात गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाला. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली. काही मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटला होता, परंतु रात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे यांनी वैभव शिर्के यास बोलावून घेतले व दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

दर्शन दोंदेने गावठी पिस्तूल काढत वैभव वर रोखली असता जीव वाचवण्यासाठी वैभवने पालायन करण्याचा प्रयत्न केला. दर्शनने त्याच्यावर पाठीमागून गोळीबार केला. नेम चुकल्याने वैभव वाचला. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात रात्री घडली गुंडांनी तलवार घेवुन परिसरात दहशत माजवली. या घटनेने संपूर्ण परिसर हा हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झाले होते. याबाबत अंबड पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेत 6 संशयित ताब्यात घेण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT