Crime News Saam Tv
क्राईम

Amaravati Crime News: शरीर संबंधास नकार दिल्याने महिलेची डोक्यात दगड घालून हत्या; मृतदेह विहिरीत फेकला

Woman Killed In Amaravati: अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शरीर संबंधाला नकार दिल्यामुळे एका महिलेची हत्या करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Woman killed Body Dumped In Well

अमरावती (Amaravati) जिल्ह्यात दिवसेंदिवस खूनाच्या घटनांमध्ये भर पडत आहे. नुकतेच जिल्ह्यातीस नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शरीर संबंधाला नकार दिल्यामुळे एका महिलेची हत्या (woman killed) करण्यात आली आहे. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.  (Latest Crime News)

शरीर संबंधास नकार दिल्याने हत्या

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एकलासपूर शेत शिवारातील एका विहिरीत महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महिलेने शरीर संबंधास (physical relation) नकार दिल्याने तिच्या डोक्यात दगड घालून महिलेची हत्या केली. तिचा मृतदेह विहिरीत टाकल्याचं समोर आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर घटनेचा उलघडा

पोलिसांनी या प्रकरणी आकाश मंदूरकर याला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून या घटनेचा उलगडा करण्यात (Amaravati Crime) आलाय. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत होते. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय.

नक्की काय घडलं

एकलासपूर शेतशिवारातील चंदू गावंडे यांच्या शेतातील विहिरीत ३१ जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यात मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. यात पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, डोक्यावर मार असल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचं उघड झालं होतं. २ फेब्रुवारी रोजी खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत होते. ५ फेब्रुवारी एलसीबीने आकाश मंदुरकर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली.

आरोपी आकाशने ती महिला तालुक्यातील खेडपिंपरी येथील असल्याचं सांगितले. चौकशीत त्याने तिच्या खुनाची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपी तीन महिन्यांपासून मृत महिलेसोबत फोनवर संपर्कात होता. तो दररोज तिच्यासोबत फोनवर, व्हॉटसअप, व्हिडीओ कॉलवर बोलत होता. २५ जानेवारी रोजी ती महिला नांदगांव खंडेश्वर येथे आली होती. त्यादिवशी दोघेही संध्याकाळी आकाशच्या एकलासपूर शिवारातील शेतात भेटले होते.

बदनामी करण्याची धमकी

आकाशने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिच्याकडे आग्रह धरला. त्यामुळे दोघांत वाद झाला. तिने ही बाब आकाशच्या घरी सांगण्याची व गावात बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे आकाशने शेतातील दगड उचलून तिच्या डोक्यात (crime news) घातला. यातच तिचा मृत्यू झाला. ती मरण पावल्याची खात्री झाल्यावर आकाशने तिच्या अंगावरील साडी, पेटीकोट, स्टोल व चपला काढल्या. तिचा मृतदेह उचलून तो चंदू गावंडे यांच्या शेतातील विहिरीत टाकला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोणताही सुगावा नसताना मयताची ओळख पटविली. गुन्हा उघडकीस आणला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: 27 ऑक्टोबरपासून 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; मंगळ ग्रह करणार स्वतःच्याच राशीत प्रवेश

Maharashtra Live News Update: ५ दिवस पुन्हा अवकाळी, उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी

Success Story: जर्मनीतील नोकरी सोडली, भारतात रिसेप्शन म्हणून काम केले, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक, IPS पूजा यादव यांचा प्रवास

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

SCROLL FOR NEXT