Uttar Pradesh Aligarh Police Constable Sexual Favour Allegation Saam Tv
क्राईम

Shocking : खाकीला काळिमा! गुन्हा दाखल करायला आलेल्या बलात्कार पीडितेकडे शरीरसुखाची मागणी; पोलीस दलात खळबळ

Uttar Pradesh Police Constable News : अलीगडमध्ये बलात्कार पीडितेकडून न्याय मिळवून देण्याच्या बदल्यात पोलिसाने शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • अलीगडमध्ये पोलिसावर गंभीर गैरवर्तनाचा आरोप

  • पीडितेकडून न्यायाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी

  • वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार दाखल

  • कडक कारवाईचे आश्वासन

Uttar Pradesh Aligarh Police Constable Sexual Favour Allegation उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये एका बलात्कार पीडितेची मदत करण्याऐवजी, पोलीस कॉन्स्टेबलने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. "जर तुला न्याय हवा असेल आणि आरोपीवर कारवाई करायची असेल, तर तुला माझ्यासोबत झोपावे लागेल," असं संतापजनक वक्तव्य या पोलिसाने केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका बलात्कार प्रकरणाची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात सतत ये जा करत होती. या प्रकरणाचा तपास किंवा कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या बहाण्याने संबंधित कॉन्स्टेबलने तिला बोलवले.

पोलिसाने तिला एकांतात बोलावून अश्लील मागणी केली. न्याय मिळवून देण्याच्या बदल्यात त्याने तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच आपण दोघे एकाच समाजाचे आहोत. तुला आरोपीवर कारवाई व्हावी असे वाटत असेल तर माझ्यासोबत झोप, असे त्याने तिला म्हटले.

पोलीस कर्मचाऱ्याच्या या वागणुकीमुळे पीडितेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. तिने या संपूर्ण प्रकरणाची कैफियत मांडली असून आरोपी पोलिसाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून अलीगड पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले असून, दोषी आढळल्यास त्या कॉन्स्टेबलवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉर्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी गोळ्या-औषधांऐवजी करा ही 6 योगासने, एकदम फिट राहाल

Pune BJP : पुण्यात भाजपचा 'ट्रिपल स्ट्रोक'! निवडणुका नसतानाही तिघांचा पक्षात प्रवेश

Heart Attack : महिलांनो! 'या' वयानंतर वाढतो हार्ट अटॅकचा धोका, ३ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

भीषण अपघात! बस उलटल्याने 12 प्रवाशांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग; BKC आणि सूरत स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT