Alandi Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : देवाची आळंदी पुन्हा हादरली, वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर अत्याचार

Alandi News : आळंदीमध्ये एका खासगी शिक्षण संस्थेत वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर तिथल्याच शिक्षकाने अत्याचार केला आहे. याआधीही आळंदीतील शिक्षण संस्थांमध्ये अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.

Yash Shirke

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे देवाची आळंदी पुन्हा एकदा हादरली आहे. आळंदीत खासगी शिक्षण संस्थांमध्ये काही नराधम हे वारंवार विद्यार्थ्यांवर अत्याचार करत असल्याचे वारंवार उघडकीस आले होते. आता पुन्हा एकदा आळंदी येथे एका विद्यार्थावर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

आळंदीमध्ये वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणाऱ्या खासगी शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांवर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या घटना थांबण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वी आळंदीला भेट दिली होती. त्यांनी बेकायदेशीर आणि नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देखील केल्या होत्या.

पण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलेल्या सूचनाचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. आळंदीमध्ये पुन्हा एका विद्यार्थ्याला अत्याचाराला, छळाला तोंड द्यावे लागले आहे. या पीडित विद्यार्थ्यावर शिक्षण संस्थेतील शिक्षकानेच बाल लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

अत्याचार प्रकरणी विद्यार्थ्यांनी संस्था चालकांकडे तक्रार केली होती. पण संस्था चालकाने हा प्रकार दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यार्थ्यांद्वारे अत्याचार करणारे शिक्षक आणि खासगी शिक्षण संस्थेचे चालक यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणासंबंधित तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Gift Reel: सोनपापडी नाही! दिवाळीला असं गिफ्ट दिलं की लोकांनी विचारलं व्हॅकेन्सी आहे का? व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० लोकल स्टेशन्सचं होणार कायापालट, लवकरच रेल्वेच्या नियंत्रणात जाणार

Diwali 2025 : जेवणाचा मेन्यू ठरला! फक्त ३० मिनिटांत बनेल स्पेशल थाळी, एकदा ट्राय तर करा 'या' सिंपल रेसिपी

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT