Akola Crime Saam Tv
क्राईम

Crime: सासुरवाडीत जावयाची निर्घृण हत्या, घरगुती वाद मिटवताना भयंकर घडलं; चाकू अन् कुऱ्हाडीने वार नंतर...

Akola Crime: अकोल्यामध्ये सासरच्या लोकांनी जावयाची निर्घृण हत्या केली. घरगुती वाद मिटवत असताना हाणामारी झाली. त्यानंतर चाकू आणि कुऱ्हाडीने वार करत जावयाची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • अकोल्याच्या अंबाशी गावात जावयाची हत्या करण्यात आली.

  • चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करत जावयाला जागीच संपवलं.

  • घरगुती वाद मिटवण्यासाठी गेलेल्या जावयाची हाणामारीदरम्यान हत्या.

  • पोलिसांनी तिघांना अटक करून तपास सुरू केला आहे.

अकोल्यामध्ये जावयाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून हत्या करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. घरगुती वाद मिटवण्यासाठी तरुण सासुरवाडीत गेला होता. पण वाद मिटवत असताना हाणामारी झाली. यावेळी चाकू अन् कुऱ्हाडीने वार करत जावयाला जागीच संपवण्यात आले. या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती वादातून अकोल्यात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावामध्ये ही घटना घडली. नागेश गोपनारायण असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. नागेश बायकोच्या माहेरी अंबाशी गावात आला होता. या ठिकाणी नागेश आणि त्याच्या सासरच्या लोकांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला.

सुरूवातीला शाब्दित बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. सासरच्या काही नातेवाईकांनी नागेशवर काठ्या, चाकू अन् कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी झाला. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे नागेशचा जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात चान्नी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. सिध्दार्थ शांताराम चोटमल, रेखा शांताराम चोटमल आणि नंदा दिलीप डोंगरे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गुढीपाडवा निमित्त अमरावतीत बाजारपेठा सज्ज

Maratha history: छत्रपती संभाजी राजांनी औरंगजेबाचं लाडकं शहर बुऱ्हाणपूरवर का मोहीम केली? यावेळी किती लूट करण्यात आली?

Gudi Padwa 2026 Wishes: गुढीपाडवा आला! प्रियजनांना पाठवा हे खास मेसेज; मराठी, हिंदी, इंग्रजी WhatsApp स्टेटस वाचा एका क्लिकवर

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! घिरट्या घालत हॅलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं; दुर्घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्यापासून सुरू होतंय विक्रम संवत 2083; तुमच्या राशीवर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT