Akola News  Saam Digital
क्राईम

Akola News : तुमची मुलं किती सुरक्षित? चॉकलेटचं आमिष देऊन ८ मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न; महिलांनी दिला चोप

Akola Crime News : अकोल्यातल्या मनपा उर्दू क्रमांक एक शाळेतील 8 विद्यार्थ्यांचा अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा अपहरणाचा प्रयत्न शिक्षकांनी हाणून पाडत ८ ही मुलांची सुटका केली आहे.

Sandeep Gawade

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यातल्या मनपा उर्दू क्रमांक एक शाळेतील 8 विद्यार्थ्यांचा अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा अपहरणाचा प्रयत्न शिक्षकांनी हाणून पाडत ८ ही मुलांची सुटका केली आहे. सायंकाळ पाच'च्या नंतर शाळा सुटल्यानंतर एका महिलेनं विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि कचोरीचं आमिष देत सोबत न्यायचा प्रयत्न केला, यामध्ये 4 मुलं आणि 4 मुलींचा समावेश होता. अपरहणकर्त्या महिलेला स्थानिक महिलांनी चांगलाचं चोप दिला असून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

अपहरणकर्त्या महिलेला सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे. महिलेंचं अपहरणाचं बिंग फुटल्यानंतर आपण मुलांचे नातेवाईंक असल्याचे सांगत होती, पण कुटुंबियांनी आणि शालेय शिक्षकांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार उजेडात आला आहे.

दरम्यान आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास अकोला महापालिकेच्या 'उर्दू मराठी क्रमाक 1' शाळा सुटलीय. सर्व विद्यार्थी शाळेबाहेर पडले, तितक्यात एका 40 वर्षीय महिलेनं 7 ते 8 शालेय विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि कचोरी सोबतचं खजूरचं आमिष दिलं. त्यानंतर सोबत नेण्याचा बळजबरी प्रयत्न केला, हा प्रकार शिक्षक आणि पालकांच्या लक्षात आला. त्यांनी धाव घेतली आणि महिलेच्या ताब्यातील मुलांची सुटका केली. या घटनेनंतर शाळेच्या आवारात घटनास्थळावर नागरिकांसह पालकांनी मोठी गर्दी झाली होती. शालेय शिक्षकांसह नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठलं, अन् तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अपहरणकर्त्या महिलेला ताब्यात घेतलं असून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती अकोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल वायदांदे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: झिशान कादरीने तान्या मित्तलला दिला धोका; बिग बॉसच्या घरात नेमंक चाललंय तरी काय?

Pune : महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार, बोनससह सानुग्रह अनुदानात वाढ

Chanakya Niti: खुश राहण्यासाठी 'या' सिक्रेट टिप्स करा फॉलो, चाणक्यांचा खास सल्ला

Nandurbar Zp School : दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेची 'तीन'लाच सुट्टी; विद्यार्थी वाऱ्यावर सोडून शिक्षक दुपारीच फरार

Vastu Tips For Home: वास्तुशास्त्रानुसार या शुभ वस्तू घरात ठेवा, हातात खेळता पैसा राहील

SCROLL FOR NEXT