Nagpur News: धक्कादायक! 'आईला सांगू नका' अशी चिठ्ठी लिहून प्रशिक्षणार्थी महिला शिपायाने संपवलं जीवन, प्रशिक्षण केंद्रात खळबळ

Female Constable Ends Life In Police Training Center: नागपुरमध्ये प्रशिक्षणार्थी महिला शिपायाने आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्येच तिने जीवन संपवलं आहे.
प्रशिक्षणार्थी महिला शिपायाने संपवलं जीवन
Female Constable Ends LifeSaam Tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपुरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. नागपुरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी महिला शिपायाने आत्महत्या केलीय. गळफास लावून या महिला शिपायाने जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे नागपुरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात मोठी खळबळ उडालेली आहे. या महिलेनं जीवन संपविण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे.

नक्की कशी घडली घटना?

नागपुरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रतीक्षा भोसले नावाची महिला शिपाई प्रशिक्षण घेत (Nagpur News) होती. प्रतीक्षा भोसले विवाहित आहे. ती पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. प्रतीक्षाने वसतिगृहातील पाण्याच्या टाकीच्या लोखंडी पायऱ्यांना गळफास लावून जीवन संपवलं आहे. फेब्रुवारीपासून ती नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत (Nagpur Police Training Center) होती.

मरण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली

प्रतीक्षाने कौटुंबिक नैराश्यातून आत्महत्या केल्याची शंका उपस्थित केली जात आहे. प्रतीक्षाने मरण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी हाती लागली आहे. या चिठ्ठीत तिन 'मी आत्महत्या केल्याचं माझ्या आईला कळू देऊ नका' असं नमूद केलंय. त्यामुळे विविध प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत. ही घटना ८ जूलै रोजी घडल्याचं सांगितलं जातंय, परंतु ही घटना ९ जूलै रोजी सकाळी उघडकीस (Female Constable Ends Life) आली.

प्रशिक्षणार्थी महिला शिपायाने संपवलं जीवन
Robot End Life: धक्कादायक! कामाच्या ताणामुळे रोबोटने संपवलं जीवन, जगातील पहिलीच घटना

भाईंदरमधील धक्कादायक घटना

भाईंदरच्या स्थानकात रेल्वेच्या खाली येऊन बापलेकानी आत्महत्या केल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास भाईंदर रेल्वे स्थानकात ही घटना घडलीय. हरिश मेहता आणि जय मेहता असं मृत्यू झालेल्या वडिल-मुलाचं नाव (Ends Life) आहे. रेल्वे पोलिसांनी त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले होते. त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं, हे अजून समोर आलेलं नाही. वसई रेल्वे पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

प्रशिक्षणार्थी महिला शिपायाने संपवलं जीवन
Mumbai Police officer ends life : धक्कादायक! मुंबईत पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, पोलीस वसाहतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com