Akola Batwadi Village Crime News: Saamtv
क्राईम

Akola Crime News: जागेचा वाद, गाढ झोपेत असतानाच एकाला संपवलं; अकोल्यातील थरारक घटना

Akola Batwadi Village Crime News: जमिनीच्या वादादरम्यान आखरे यांना संपवण्याची धमकी इतर कुटुंबियांनी दिली होती. याच वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवली आहे.

Gangappa Pujari

अक्षय गवळी, अकोला|ता. १ एप्रिल २०२४

Akola Crime News:

तीन कुटुंबांमधील जमिनीचा वाद टोकाला गेल्याने एकाची मध्यरात्री गाढ झोपेत असतानाच काठी आणी कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आल्याची घटना अकोल्यामध्ये घडली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील बटवाडी गावात ही घटना घडली. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बाळापूर पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

ही संपूर्ण घटना अकोल्याच्या (Akola) बाळापुर तालुक्यातील बटवाडी गावातील आहे. या गावामध्ये राहणाऱ्या आखरे, पुंडे आणि कुटे अशा तीन कुटुंबात सरकारी जागेवरुन वाद सुरू होते. काल आखरे कुटुंबातील एकाने या वादग्रस्त जागेवर खत आणून टाकले होते तर त्याच खतावर दुसऱ्या एका कुटुंबाने जनावरे आणून बांधली होती. यावरुनच रात्री उशिरापर्यंत तिन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता.

रात्री वाद अन् पहाटे हत्या..

हा वाद मिटवून सर्वजण आपापल्या घरी गेले. अशातच नितीन सुधाकर आखरे (वय, ३३) हे घराच्या अंगणात झाेपले होते. याचवेळी काही अज्ञात लोकांनी येऊन त्यांच्यावर लाठीकाठीने हल्ला चढवला. या हल्ल्यात नितीन आखरे यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी आखरे यांच्या पत्नी त्यांना उठवायला आल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. ज्यानंतर त्यांनी आरडा-ओरडा करत गावकऱ्यांना जमा केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१० जण ताब्यात..

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत संपूर्ण घटनेचा पंचनामा करत तपास सुरू केला आहे. जमिनीच्या वादादरम्यान आखरे यांना संपवण्याची धमकी इतर कुटुंबियांनी दिली होती. याच वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी १० जणांना ताब्यात घेतले आहे. (Crime News in Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Recharge Plan Offer: भारीच! आपल्या प्रियजनांशी मनमुराद बोला! 'या' टेलिकॉम कंपनीची भन्नाट ऑफर

KDMC News : वाहतूक कोंडीमुळे १ मिनिटे उशीर झाला, केडीएमसीच्या नोकरभरतीची उमेदवारी हुकली, परीक्षार्थींचा संताप

Laxman Hake: मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात गेवराईत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT