Viral video shows minor girl being assaulted by teen boy in Akola, triggering public outrage. Saam TV News Marathi
क्राईम

Crime : दुसऱ्या मुलासोबत का बोलते? अकोल्यात भररस्त्यात मुलीला मारहाण, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Akola Teen Violence: अकोल्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीला "दुसऱ्या मुलासोबत का बोलते?" या कारणावरून भररस्त्यात काठीने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola khadan police search for teen boy after viral beating video : त्याच्यासोबत का बोलते? असे म्हणत एका मुलीला बेदम मारल्याची घटना अकोल्यात घडली आहे. मोबाईलवर फोटो दाखवत अल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलाने काठीने मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झल्यानंतर अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मुलाचा शोध घेतला जात आहे.

अकोल्यामध्ये भररस्त्यात मुलीला काठीने बेदम मारहाण झाली. अकोल्यातील या घटनेनं खळबळ उडाली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अकोल्यातल्या खदान पोलिस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडल्याचे समोर आलेय. मारहाण करणारा मुलगा आणि ज्या मुलीला मारहाण झाली, ती मुलगी देखील अर्थातच दोघेही जण अल्पवयीन असल्याचे बोललं जात आहे. अकोल्यात या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, सद्यस्थिती हा मारहाणीचा व्हिडिओ अकोल्यात व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर यासारख्या समाजमाध्यमांवर चांगलाच वायरल होत आहे. मारहाण करणारा मुलगा मुलीला चांगल्या प्रकारे ओळखतो. तू इतर मुलाशी का बोलते, याच कारणावरून मुलगा भर रस्त्यात मुलीला हातातील काठीने मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र मारहाण करत असताना कुणीही या मुलाला रोखण्याचा प्रयत्न देखील केला नाही.

व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेची दखल घेतली. कुटुंबीयांचा शोध घेत त्यांची भेट घेतल्यानंतर अखेर मुलीच्या आईने मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात तक्रार दाखल केली.. या प्रकरणात पोलिसांनी विनयभंगासह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केली आहेत. दरम्यान, खदान पोलीस मारहाण करणाऱ्या मुलाचा शोध घेत आहेत. अकोल्यातील खदान पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: केमिकल नको, घरगुती सामग्रींनी घरीच बनवा लिप बाम; या थंडीत ड्राय ओठांपासून ३ दिवसात मिळेल सुटका

Poor Sleep: तुमच्या 'या' वाईट सवयीमुळे झोप येण्यास येतो अडथळा, आजच टाळा

Last Stop Khanda Marathi Movie: प्रत्येकाला थिरकायला लावणारं "लास्ट स्टॉप खांदा" चित्रपटाचं टायटल साँग रिलीज, चित्रपट या दिवशी होणार रिलीज

Maharashtra Live News Update: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन

Rohit Arya Encounter: पवई ओलीसनाट्यातील आरोपीच्या छातीत गोळ्या, पोलिसांनी केला रोहित आर्याचा एन्काऊंटर|VIDEO

SCROLL FOR NEXT