Akola Crime Saam TV
क्राईम

Akola Crime: काँग्रेस नेत्याच्या भावाची क्रूरतेने हत्या, हत्येमागचं धक्कादायक कारण समोर, हत्याकांडाचा धडकी भरवणारा VIDEO

Congress Leader Brother killed Case: अकोल्यातील काँग्रेस नेत्याच्या भावाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामागचं धक्कादायक कारण समोर आले आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Priya More

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय कौसल यांचे लहान बंधू आणि जिल्हा परिषदचे माजी उपअभियंता संजय कौसल यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. संजय कौसल यांच्या हत्येमागचं खरं कारण अकोला पोलिसांच्या तपासातून उघड झालं आहे. हत्या करण्यात आलेले संजय कौसल आणि मारेकरी महेंद्र पवार यांच्यात दुपारी वाद झाला होता. हाच तोच वाद विकोपाला गेला आणि त्याच रात्री महेंद्र पवारने संजय कौसल यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

सेवानिवृत्त ६० वर्षीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी उपअभियंता संजय कौसल हत्या प्रकरण कालपासून अकोल्यात चांगल चर्चेत आहे. अकोल्यातल्या रणपिसे नगरात सोमवारी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास हे थरारक हत्याकांड घडलं होतं. या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. दोन जणांनी संजय कौसल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही महेंद्र पवारने कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने वार केले अन त्यांना जागीच ठार केलं.

अकोला शहरातील मुरलीधर कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये हे हत्याकांड घडलं. मारेकरी महेंद्र पवार आणि संजय कौसल हे दोघेही मुरलीधर टॉवर्समधील रहिवासी आहेत. याच अपार्टमेंटच्या गेटसमोर ही थरारक हत्याकांडाची घटना घडली होती. अपार्टमेंटच्या गेटसमोर खुर्चीवर बसलेल्या संजय कौसल यांच्यावर महेंद्र पवारने वार करून कायमचं संपवलं.

घडलं असं की, सोमवारी दुपारी संजय कौसल आणि महेंद्र पवार या दोघांमध्ये मुरलीधर कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगवरून वाद झाला. त्याचाच राग महेंद्र पवारने मनात धरला. महेंद्र पवारचा राग अनावर झाला आणि त्यातूनच त्याने संजय कौसल यांची हत्या केली. महेंद्र पवार हा अतिशय रागीट व्यक्ती आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांनी दिली.

आरोपी महेंद्र पवारने या अगोदर देखील रागातून कॉम्प्लेक्सच्या सुरक्षारक्षकावर प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये सुरक्षारक्षक गंभीर स जखमी झाला होता. काही महिन्यांपूर्वीचं महेंद्र पवार हा जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने संजय कौसल यांची हत्या केली. या हत्येच्या घटनेनंतर महेहें पवार हा घटनास्थळावरून पळाला होता. मात्र पोलिसांनी 2 तासातचं अकोल्यातल्या जवाहर नगर भागातून त्याला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT