ahmednagar police arrest two youth in rs 10 lakh dacoity case  saam tv news
क्राईम

Ahmednagar Crime News : तलवारीचा धाक दाखवून दहा लाख रुपये लुटणा-या युवकांना शेवगावमध्ये अटक

Shevgaon : कोवळ्या वयातील मुलांनी इंडस्ट्रीच्या कर्मचाऱ्यावर पाळत ठेवून गुन्हा केला असून पालकांनी आपल्या मुलावर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News :

तीन महिन्यांपूर्वी नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे तलवारीचा धाक दाखवून दहा लाख रुपये लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. या दोघांकडून लुटीचे दहा लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेतून देण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेवगाव येथील तिरुपती कॉटन इंडस्ट्रीचा चेक बडोदा बँकेत देऊन दहा लाख रुपये घेऊन येताना कंपनीतील कर्मचाऱ्यास तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडून दहा लाख रुपये लुटण्यात आले हाेते. ही घटना 28 डिसेंबरला घडली होती.

या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिले होते. त्यानुसार आरोपींचा शोध घेत असता आरोपी शेवगाव येथील त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून आरोपीच्या राहत्या घरातून आरोपी चेतन प्रमोद तुजारे (19 वर्ष) व समाधान विठ्ठल तुजारे (20 वर्ष) या दोघांना अटक केली आहे. दरम्यान यांचा तिसरा साथीदार अर्जुन तुजारे हा अद्यापही फरारच आहे. दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या दोघा आरोपींकडून दहा लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

19 व 20 वर्ष असलेल्या कोवळ्या कॉलेज तरुणांनी संबंधित इंडस्ट्रीच्या कर्मचाऱ्यावर पाळत ठेवून हा गुन्हा केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलावर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जात पात पाहून मी कधी राजकारण केलं नाही - धनंजय मुंडे

Dry Lips Care: तुमचेही ओठ खूपच कोरडे होतायेत? या सोप्या टिप्स करा फॉलो

Budh Gochar 2025: डिसेंबर महिन्यात २ वेळा गोचर करणार राजकुमार बुध; 'या' ३ राशींच्या व्यक्ती होणार करोडपती

Lehenga Selection: लग्नसराईसाठी लेहेंगा खरेदी करायचा आहे? मग शॉपिंगला गेल्यावर 'या' गोष्टींची घ्या काळजी

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेटच्या नियमांत बदल; सर्व कामे होणार ऑनलाइन; स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT