Sangamner News Saam tv
क्राईम

Sangamner News: उपकारागृहाचे गज तोडून चार आरोपींचे पलायन; पोलीस ड्युटीवर असताना केली हिंमत

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहमदनगर) : खून आणि बलात्कार या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले चार आरोपी उपकारागृहात शिक्षा भोगत होते. दरम्यान या चार आरोपींनी उपकारागृहाचे गज तोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना आज (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपींचा शोध घेण्याचे अवाहन पोलिसांसमोर असणार आहे. (Tajya Batmya)

अहमदनगर जिल्ह्यात वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी संगमनेर (Sangamner) कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा चार आरोपींनी सकाळी ७ वाजेच्या सुमारास चक्क कारागृहाचे गज तोडून पलायन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ४ पोलिस कर्मचारी ड्युटीवर असताना उपकरागृहातील गज कापून बलात्कार आणि खून अशा गंभीर गुन्ह्यातील राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा ददेल, अनिल काळे या आरोपींनी कारागृहाचे जाड गज कापून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडल्याने संगमनेर (Police) पोलिस सुरक्षा व्यवस्थे संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जेलमधून कैदी पळून गेल्याने संगमनेर पोलिसात खळबळ उडाली असून कारागृहातील कैद्यांना गुटखा, तंबाखू, बाहेरचे जेवण, मोबाईल आदी सुविधा सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप अनेकदा झाला. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्य न दाखवल्याने चार जणांनी गज कापून पलायन केले असल्याची चर्चा सुरू आहे. सकाळी उजेड पडल्यानंतर चार आरोपी सहजासहजी पळून जाऊ शकत असतील तर या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT