Police investigation underway after a dancer was seriously injured in a sickle attack by her friend in Jamkhed. saamtv
क्राईम

"माझा नंबर का ब्लॉक केला?" तरुणाचं टाळकं फिरलं, घरात घुसून नृत्यांगनेच्या डोक्यातच कोयता घातला

Ahmednagar Crime: जामखेडमध्ये एका २६ वर्षीय नृत्यांगनेवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केला. पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

Bharat Jadhav

  • जामखेडमध्ये नृत्यांगनेवर तिच्याच मित्राचा कोयत्याने हल्ला

  • “माझा नंबर का ब्लॉक केला?” म्हणत घरात घुसून वार

  • हल्ल्यात महिला गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

जामखेड शहरातील तपनेश्वर भागात एक धक्कादायक घटना घडलीय. नृत्यांगना असलेल्या मैत्रिणीने नंबर ब्लॉक केल्याने संतापलेल्या मित्राने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. सांस्कृतिक कला केंद्रातील २६ वर्षीय नृत्यांगनेवर तिच्याच मित्राने कोयत्याने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जामखेडमध्ये घडली.

या घटनेतील मुख्य संशयित आरोपी हा गेवराई तालुक्यातील असून, “तू माझ्याशी फोनवर का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केला?" असा जाब विचारत त्याने नृत्यांगनेवर कोयत्याने वार केला. . या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खळेगाव (ता. गेवराई, जि बीड) येथील रहिवासी असलेला आरोपी राहुल अशोक कचरे आणि पीडित महिला यांच्यात मागील पाच वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. मात्र, राहुल याच्या त्रासाला कंटाळून महिलेने यापूर्वीही त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. गुरुवारी रात्री आरोपीने फोन करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

त्यानंतर शुक्रवारीपहाटे दोन वाजेच्या सुमारास जेव्हा महिला आपल्या खोलीवर होती, तेव्हा आरोपी तेथे दबा धरून बसला होता. संधी साधत त्याने तरुणीच्या घरात प्रवेश केला. आरोपीने रागाच्या भरात महिलेच्या हातावर, बोटांवर आणि डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले. पीडित महिलेच्या मैत्रिणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिलाही धमकावले आणि “मी तुला संपवूनच टाकणार" असे म्हणत घटनास्थळावरून पसार झाला.

याप्रकरणी २६ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई) याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

SCROLL FOR NEXT