Ahmednagar Latest News:  Saam Digital
क्राईम

Ahmednagar Crime: जेवणावरुन वाद, मद्यधुंद टोळक्याचा हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला, तलवार अन् कोयत्याने वार!

Ahmednagar Latest News: पारनेर तालुक्यातील निघोज - वडगाव रस्त्यावरील हॉटेल जत्राचे मालक प्रदीप भुकन यांच्यावर दारूच्या नशेत जेवणाच्या कारणावरून सहा ते सात जणांनी तलवार, कोयता आणि चोपरने प्राण घातक हल्ला केला आहे

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. ३ जुलै २०२४

जेवणावरुन झालेल्या वादातून हॉटेल मालकावर सहा ते सात जणांनी तलवार कोयता आणि चोपरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून दोषींवर करक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील निघोज - वडगाव रस्त्यावरील हॉटेल जत्राचे मालक प्रदीप भुकन यांच्यावर दारूच्या नशेत जेवणाच्या कारणावरून सहा ते सात जणांनी तलवार, कोयता आणि चोपरने प्राण घातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात मालक प्रदीप भुकन यांच्या हातावर आणि पायावर वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच हॉटेलचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

या हल्ल्यात जखमी झालेले प्रदीप भुकन यांच्यावर अहमदनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी निघोज या गावात दारूबंदी केली असून देखील या गावच्या परिसरात दारू विक्री केली जाते. पारनेर तालुक्यात अनेक हॉटेलमध्ये सर्रास अनाधिकृत पणे दारू विक्री केली जाते. त्यातूनच अशा घटना समोर येत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अवैद्यधंद्यांना अळा घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! महायुती सरकारला मोठा धक्का; माणिकराव कोकाटे यांचा मंत्रि‍पदाचा राजीनामा

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा

Mumbai Municipal Corporation: राज्यात तिसरी आघाडी होणार? काँग्रेसच्या हाताला, आंबेडकरांची साथ?

Fact Check : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, पडद्यामागील सत्य आलं समोर

EPFO Update: पीएफ खात्यातून पैसे काढण्याची झंझट संपणार; ATM ची सुविधा कधीपासून सुरू होणार, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT