Ahmednagar Breaking News:  Saamtv
क्राईम

Ahmednagar Crime: 'माझ्या नवऱ्याला मेसेज का करतेस?', डॉक्टर महिलेकडून नर्सला बेदम मारहाण, जीवे मारण्याची धमकी; नगरमधील घटना

Ahmednagar Breaking News: अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात ही घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. २६ मे २०२४

डॉक्टर महिलेकडून एका नर्सला घरात घुसून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमधून समोर आला आहे. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात ही घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या धक्कादायक घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात एका नामवंत डॉक्टर महिलेने एका नर्सच्या घरात घुसून लोखंडी गजाने मारहाण केल्याचा प्रकार घडला. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. डॉ. माधुरी जगताप असे मारहाण करणाऱ्या डॉक्टर महिलेचे नाव असून या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ.माधुरी जगताप यांनी येऊन माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मॅसेज का करतेस? अशी विचारणा करत मारहाण केल्याचे पीडित नर्सने सांगितले. डॉक्टर महिलेने हातातील पाईपमध्ये लोखंडी गज टाकून कपाळावर, डोक्यात, डाव्या हाताच्या मनगटाजवळ, उजव्या पायाच्या गुडघ्यावर, गजाने मारहाण करून मला जखमी करून केस धरून मला खाली पाडले तसेच गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडले, अशी तक्रार नर्स महिलेने केली आहे.

तसेच 'पुन्हा जर नादी लागली तर तुला फाशी देऊन मारीन आणि गावात राहिली तर तुला सुपारी देऊन मारून टाकील, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करू देणार नाही', अशी धमकीही दिल्याचे पीडीत महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

High Blood Pressure : काजू-बदाम नाही; हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ड्रायफ्रूट वरदान

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल, VIDEO समोर

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा हप्ता; ₹२००० मिळवण्यासाठी हे काम लगेच करा

Pune Tourism : २००० वर्षांहून अधिकचा ऐतिहासिक वारसा जपतेय 'हे' ठिकाण, लोखंडासारखा मजबूत आहे किल्ला

SCROLL FOR NEXT