Crime News : अहमदनगरमध्ये गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. केडगाव उपनगरात प्राचार्याने अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. प्राचार्यावर नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १०, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. संतोष सुधाकर देवरे असे गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याचे नाव आहे.
घरच्यांना ही गोष्ट सांगितल्यास आई-वडिलांना जीवे मारण्याची दिली होती प्राचार्याने धमकी दिली होती. गुन्हा दाखल होताच प्राचार्य संतोष देवरे फरार झालाय. संतोष देवरे याला पकडण्यासाठी तीन पोलीस पथके विविध जिल्ह्यात रवाना झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. अत्याचाराची घटनेची माहिती मिळताच नगरमध्ये एकच खळबळ उडाली.
नगर शहरातील केडगाव उपनगरातील उदयन राजे नगर मधील एका विद्यालयातील प्राचार्याने अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. अभ्यासासाठी घरी येत असलेल्या शालेय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याची तक्रार अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदवली. संतोष देवरे हा ओआयसीस महाविद्यालय समोर राहत असून अल्पवयीन मुलास अभ्यासाच्या नावाखाली स्वतःच्या रूममध्ये बोलवून घेत होता. त्या ठिकाणी अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करत होता. ही गोष्ट घरी सांगितली तर आईवडीलांना मारुन टाकेल, अशी धमकीही प्राचार्य संतोष देवरे हा त्या अल्पवयीन मुलास देत होता.
गुन्हा दाखल होताच प्राचार्य संतोष देवरे हा फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी विविध ठिकाणी तीन पोलीस पथके रवाना केली असल्याची माहिती शहराचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी दिली आहे. प्राचार्य असलेल्या संतोष देवरे याच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुलाच्या आईच्या फिर्यादी वरून 176 / २०२५ बी एन एस २०२३ चे कलम ३५१ ( २ ) सह लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १०, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे हे करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.