Akola Crime Saam tv
क्राईम

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

Agniveer Soldier Physical Assaulting Transgender: अकोला जिल्ह्यातील रुईखेड गावात २९ वर्षीय ट्रान्सजेंडर व्यक्तीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय. याप्रकरणी २३ वर्षीय अग्निवीर सैनिकाला अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Bharat Jadhav

  • लग्नाचे आमिष दाखवून एका 29 वर्षीय किन्नर तरुणावर अत्याचार

  • अकोट तालुक्यातल्या रुईखेड गावातील धक्कादायक प्रकार

  • अकोट ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून एका 29 वर्षीय तरुणावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या रुईखेड गावात हा धक्कादायक प्रकार घडलाये. दरम्यान, अत्याचार पीडित 29 वर्षे तरुण हा किन्नर असल्याचे बोलले जाते. एका 23 वर्षीय अग्निवीर जवानाने लग्नाचं आमिष या किन्नरवर अत्याचार केलाय.

अकोट ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. विशाल सुनील इंगळे असं किन्नर वर अत्याचार करणाऱ्या अग्निवीर जवानाचं नाव आहे. दरम्यान, या घटनेने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून मोठी चर्चा आहे.

नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?

पीडित 29 वर्षीय तरुण राहुल (बदलेले नाव) याने अकोला जिल्ह्यातील अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की विशाल सुनील इंगळे (वय 23, रुईखेड ता. अकोट जि. अकोला) याने लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. तालुक्यातीलच ग्राम रुईखेड तसेच अकोट शहर येथील एका फ्लॅटवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

28 आणि 30 ऑक्टोबरदरम्यान अत्याचार केल्याची घटना घडली. दरम्यान, पीडित राहुलने तक्रारीत पुढे म्हटलं आहे की 'माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, तुझ्या सोबत लग्न करतो, असं म्हणतं लग्नाचं आमिष दाखवलं, अशाप्रकारे विशाल'ने प्रेमाचा प्रस्ताव ठेवत पीडित किन्नरसोबत वारंवार शारीरीक संबंध प्रस्थापित केलं.

या अगोदरही नेहमी शारीरीक संबध करु दे, म्हणून मागणी करू लागला होता. ज्यावेळी राहुलकडून नकार यायचा, तेव्हा तो रागात शिवीगाळ करून शरीर सुखाची मागणी रेटून धरायचा, त्यानंतर लग्नाबाबत विशालकडं विचारपुस केली असता त्याने लग्नाला स्पष्ट नकार दिल्याचा आरोप देखील राहुलने तक्रारीत केलाय.

दरम्यान, या प्रकरणात आकोट ग्रामीण पोलिसांनी आरोप असलेल्या विशाल इंगळेविरुद्ध 75, 296, 351 (2) BNS 2023 सहकलम 18 (D) तृतीय पंथी (हक्काचे संरक्षन) अधिनीयम-2019 अशा विविध कलमान्वयेनुसार गुन्हा केला आहे. विशाल हा अग्निवीर दलात जवान म्हणून कार्यरत आहे, सुटीवर घरी परतल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण घडलं होतं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

Shukra Asta 2025: धन दाता शुक्र होणार अखेर अस्त; या राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

Maharashtra Politics: अजित पवारांनी मोठा डाव टाकला; एकाच दिवशी भाजप आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का

Mumbai Travel : 2025 ला निरोप अन् नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत, मुंबईकरांनो न्यू इयरला 'या' ठिकाणी नक्की जा

SCROLL FOR NEXT