Afghan Youth Beaten in Nagpur: saamtv
क्राईम

Nagpur Crime: धक्कादायक! जुन्या घरगुती वस्तूंची विक्री करणाऱ्याला जबर मारहाण; पाकिस्तानी समजून डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक

Afghan Youth Beaten in Nagpur: नागपूरमध्ये अफगाण नागरिकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडलीय. वेशभूषा आणि बोलीभाषा पाकिस्तानी असल्याच म्हणत तीन जणांनी मारहाण केलीय.

Bharat Jadhav

  • नागपूरमध्ये अफगाण नागरिकावर पाकिस्तानी समजून हल्ला झाला.

  • आरोपींनी सिमेंट ब्लॉकने डोक्यावर आणि छातीवर मारहाण केली.

  • तिघांना पोलिसांनी अटक केली असून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

  • हल्ल्याचं कारण वेशभूषा आणि बोलीभाषेमुळे चुकीची ओळख असल्याचं सांगितलं जात आहे.

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडलीय.घरगुती वस्तूंची विक्री करणाऱ्याला तिघांकडून जबर मारहाण झालीय.पाकिस्तानी नागरिक समजून दुकानदाराला शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर त्याच्या डोक्यात आणि छातीवर सिमेंट ब्लॉक घातल्याची घटना नागपूरमधील यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीत घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीय. फहीम खान उर्फ ममतुर मरगक असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.फहीम खान उर्फ ममतुर मरगक हे मागील 7 वर्षांपासून व्यवसायासाठी नागपूरमधील यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्यास आहेत. फहीम खान यांनी पठाणी घातली होती. भाषा शैली पाकिस्तनी आहे, असं वाटल्यानं तिघांनी त्यांना मारहाण केली. अजय चौव्हान, ऋषी आणि मयंक,अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत.

यातील अजय चौव्हान हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. फहीम खानवर हल्ला करण्यापूर्वी आरोपी अजयने त्याला पाकिस्तानी म्हणत हिणवले. नंतर सिमेंट ब्लॉकने छाती आणि डोक्यावर हल्ला केला. यामध्ये फहीम गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या गाडीवरही सिमेंट ब्लॉक फेकून काचा फोडण्यात आल्या.

दरम्यान फहीम हे आफगाणिस्तानचे नागरिक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरमध्ये जुन्या घरगुती वस्तू स्वस्तात घेऊन विक्रीच काम करतो. रात्री एका घरात जुना फ्रीज खरेदीच्या अनुषंगाने पाहण्यासाठी गेला. यावेळी घराबाहेर पडताच त्याला मारहाण केली वेळीच स्थानिज नागरिकांनी रोखत जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेले. यावेळी त्यांना डोक्यावर गंभीर दुखापत झाली.

यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीत काही रेफुजी अफगाणिस्तानी नागरिक राहतात. त्यांच्यातकडे रिफुजीचे सर्व कागदपत्रे आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते तेथे राहत असून ते वेगवेगळे व्यवसाय करत आहेत. मारहाण झालेले फहीम खान यांना जुना फ्रिज घ्यायचा होता. ते एका दुकानावर आले होते. त्यावेळी तिन्ही आरोपी तेथे आले. त्यांनी फहीम खान यांना विचारणा केली.

इतक्या रात्री तुम्ही येथे काय करत आहात? कुठून आलात? पाकिस्तानी आहात का अशी विचारणा करत त्यांना मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये एकजण अल्पवयीन आरोपी आहे. दरम्या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलीय, अशी माहिती नागपूर पोलीस झोन ५ चे डीसीपी निकेतन कदम यांनी माहिती दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer symptoms: पोटाचा कॅन्सर की अ‍ॅसिडिटी? दोन्ही समस्यांमधील फरक कसा ओळखाल, शरीरातील बदलांकडे लक्ष द्या

Maharashtra Live News Update: सुवर्णनगरीत सोन्याचे दर १ लाख ५ हजारांवर

Ganpati Visarjan : पुण्यात गणेश विसर्जनाला गालबोट, मुळशीमध्ये युवक बुडाला

Viral Video: दुचाकी चोरी नये म्हणून खतरनाक जुगाड, तरूणाची शक्कल पाहून चोरही चक्रावले, पाहा व्हिडिओ

Hema Malini : हेमा मालिनी यांनी अंधेरीतील २ आलिशान फ्लॅट्स विकले; किती कोटींमध्ये झाली डील, नफा वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT